Sangli News : वारणा नदीपात्रात शनिवारी उडी मारलेल्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह चौथ्या दिवशी सापडला...

मोबाईलला स्टेटस ठेवून मांगले-सावर्डे दरम्यानच्या बंधाऱ्यावरून वारणा नदीपात्रात शनिवारी उडी मारली होती.
Tushar Pandharbale
Tushar Pandharbalesakal

मांगले - मांगले-सावर्डे दरम्यानच्या बंधाऱ्यावरून वारणा नदी पात्रात शनिवारी दुपारी उडी मारलेल्या तरुणाचा मृतदेह आज चौथ्या दिवशी इनामदार, पाणंद भेंडवडे येथे वारणा नदीपात्रात सुमारे चाळीस कि.मी. अंतरावर सापडला.

मोबाईलला स्टेटस ठेवून मांगले-सावर्डे दरम्यानच्या बंधाऱ्यावरून वारणा नदीपात्रात शनिवारी उडी मारलेल्या बेपत्ता तुषार गणपती पांढरबळे (मुळ गाव-बिळाशी, सध्या मांगले) तरुणाने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केली असावी असा संशय आहे.

शनिवारी दुपारी तुषारने मांगले-सावर्डे दरम्यानच्या बंधाऱ्यावरून वारणा नदीपात्रात उडी मारली होती. गेले तीन दिवस वारणा नदी पात्रात त्याचा शोध सुरू होता.

रविवारी एन.डी.आर.एफ.च्या जवानांनी यांत्रिक बोटीच्या सहाय्याने मांगले-सावर्डे दरम्यानच्या बंधाऱ्यापासून चिकुर्डे बंधाऱ्यापर्यंत सुमारे पाच कि.मी. शोध मोहीम राबवली होती. मात्र तुषार आढळून आला नाही, विस्तीर्ण नदी पत्रात तुषारला शोधणे अवघड काम होते.

सोमवारी वारणा नदीच्या दोन्ही तीरावरून नातेवाईक आणि स्थानिक तरुणांनी शोध घेतला होता. चांदोली धरणातून सोडलेला पाण्याचा मोठा प्रवाह व प्रचंड पाण्याच्या वेगामुळे चार दिवसात मृतदेह ४० किलोमीटर अंतरावर सापडला.

दरम्यान, आज सकाळी नातेवाईक व पन्नासच्या वर तरुण वारणा नदी काठावर शोध घेत असताना शिगाव, जिल्हा कोल्हापूरच्या पुलावर मासेमारी करणाऱ्या लोकांनी मृतदेह तरंगत गेल्याचे तरूणांना सांगितले. त्यानंतर भेंडवडेच्या हद्दीपर्यंत गेल्यानंतर तुषारचा मृतदेह तरूणांना तरंगताना दिसला.

या बाबत वडगाव, ता. हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मृतदेहाची उत्तरीय तपासणी नदी काठावरच करण्यात आली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com