मंगळवेढा-सोलापूर वाहतूक बुधवारपासून बंद

हुकूम मुलाणी : सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

 नीरा व भीमा नदीला सोडलेल्या पाण्याने माचणूरच्या पुलावर पाणी आल्याने मंगळवेढा-सोलापूर वाहतूक बुधवारपासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूरला पर्यायी मार्गाने जाताना प्रवाशांना तिकिटाला दुप्पट दराने पैसे देण्याची वेळ आली.

मंगळवेढा  : नीरा व भीमा नदीला सोडलेल्या पाण्याने माचणूरच्या पुलावर पाणी आल्याने मंगळवेढा-सोलापूर वाहतूक बुधवारपासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूरला पर्यायी मार्गाने जाताना प्रवाशांना तिकिटाला दुप्पट दराने पैसे देण्याची वेळ आली.

दरम्यान, आज हवामान खात्याने पुणे जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जाहीर केल्यामुळे उजनी धरणातून जादा पाणी सोडण्यात आले आहे. आठवडाभरात पश्चिम महाराष्ट्र व कोकणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणाच्या वरच्या टप्प्यात असलेली धरणे कमी काळात पूर्णपणे भरली गेली आहेत .

दरम्यान, अतिरिक्त साेडलेल्या पाण्यामुऴे उजनी देखील तात्काळ भरल्याने जादा झालेले पाणी नदीपात्रातून व कालव्यातून सोडण्यात आले आहे. या सोडलेल्या पाण्यामुळे माचणूर व बेगमपूरच्या फुलावर पाणी आल्यामुळे मंगळवेढाहून सोलापूरला जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. 

यामध्ये दिवसभरातील मंगळवेढा आगारातून सोलापूरला जाणाऱ्या प्रतिदिन साठ फेऱ्या असून सोलापूर व सांगोला आगाराच्या फेय्रा बंद असून वरून कोल्हापूर सांगलीशी संपर्क तुटला. या सर्व फेऱ्या बंद झाल्याने महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले.

दरम्यान, मंगळवेढा वरून सोलापूरला जाण्यासाठी चडचण, झळकी, सोलापूरला जाण्यासाठी मंगळवेढा सोलापूर मार्गावर असणाऱ्यांना दुप्पट पैसे देवून सोलापूरला कामासाठी जाण्याची वेळ आली.

यामध्ये नोकरदाराबरोबर रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांना देखील या जादा दलाच्या तिकीटाचा सामना करावा लागला आहे. नदीकाठच्या भागात पुराचा विळखा आणखीन वाढला आहे. या पुराचा 98 कुटुंबांना फटका बसला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mangalvedha to Solapur road will be closed