ऑनलाईन सातबारा उताऱ्यात मंगळवेढा नंबर वन

हुकूम मुलाणी 
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

मंगळवेढा : महसूल दिनानिमित्त सोलापूर येथे उत्कृष्ट कामासाठी केलेल्या कार्यक्रमात  तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांचा दबदबा राहिलेला आहे. जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते झालेल्या या कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट तहसिलदार म्हणून तहसीलदार स्वप्निल रावडे यांना गौरविण्यात आले.

मंगळवेढा : महसूल दिनानिमित्त सोलापूर येथे उत्कृष्ट कामासाठी केलेल्या कार्यक्रमात  तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांचा दबदबा राहिलेला आहे. जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते झालेल्या या कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट तहसिलदार म्हणून तहसीलदार स्वप्निल रावडे यांना गौरविण्यात आले. तर सात बारा उताऱ्याचे संगणकीकृत करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल निवासी नायब तहसीलदार सुधाकर मागाडे यांचा तर उत्कृष्ट मंडल अधिकारी म्हणून बोराळे मंडल अधिकारी राजेंद्र बनसोडे शिवाय ऑनलाईन सातबारामध्ये भाळवणी येथील तलाठी बाळासाहेब कोळी, हुलजंतीचे विजय एकतपुरे, निंबोणीचे समाधान वगरे, गुंजेगावच्या वंदना गुप्ता यांचा तर कोतवालात इराण्णा कांबळे यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला.

डिजिटल उताऱ्यामध्ये तालुका नंबर वन राहिला. जिल्ह्यामध्ये ते अकरा लाख 80 हजार 272 इतके खातेदार असताना त्यामध्ये तालुक्यांमध्ये डिजिटल सात बारा उताऱ्याचे काम सर्वात जास्त झाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हा गौरव केला यामध्ये नवनियुक्त तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी पुढाकार घेत या डिजिटल काम करण्यात मोठे योगदान दिले. जिल्ह्यामध्ये महसूल खात्यांमध्ये रिक्त पदे मोठी असताना असल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सातबारा व इतर उत्तरे मिळवण्यासाठी तलाठी शोधावा लागत आहे परंतु डिजिटल सातबारा उतारा केल्यामुळे मिळकत सर्व शेतकऱ्यांना कुठे आहे ऑनलाइन सेंटर सातबारा उतारा काढता येऊ शकतो, परंतु उतारा काढल्यानंतर केवळ सहीसाठी बऱ्याच शेतकऱ्यांना तलाठ्यांना शोधावे लागते.

मात्र डिजिटल सातबारा उतारा काढल्यावर त्यामुळे येणार नाही विशेष म्हणजे काम वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे याचा विशेष फायदा तालुक्याच्या दक्षिण भागातील शेतकऱ्यांचा होणार आहे कारण त्याचा मंगळवेढ्यास  येण्याचा त्रास मोठ्या प्रमाणात वाचणार आहे शासनाचे क्रांतीकारी पाऊल हे त्यांच्यासाठी ठरले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mangalwedha comes first in online land document