मंगळवेढा: सुतगिरणीच्या पंचवार्षिक निवडणुकीत लाळे गटाचे वर्चस्व

हुकूम मुलाणी
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

स्व. प्रदीप लाळे यांच्या प्रयत्नातून गोळा केलेले भागभांडवल व मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी या निवडणूकीत सभासद व कार्यकर्तेनी आहोरात्र कष्ट घेतले आणि पुनश्च संधी दिली. जो पर्यंत स्मारक आणि वास्तु उभी रहात नाही तोपर्यंत फेटा बांधणार नाही.
- दत्तात्रय लाळे, पॅनेलप्रमुख

मंगळवेढा : मंगळवेढा तालुका सहकारी सुतगिरणीच्या पंचवार्षिक निवडणूकीत सत्ताधारी दत्तात्रय लाळे यांच्या गटाने 17 पैकी 14 जागावर वर्चस्व प्रस्थापित करत विरोधी गट आवताडे गटाच्या पॅनेल धुव्वा उडविला. निवडणूक जरी सुतगिरणीची असली तरी आ. भालके समर्थकाला भविष्यासाठी हा निकाल दिलासादायक ठरला.

काल तालुक्यातील नऊ मतदान केंद्रावर १४ जागेसाठी सरासरी 72  टक्के इतके मतदान झाले होते आज निवडणूक निर्णय अधिकारी म्हाळाप्पा शिंदे यांच्या अधिकाराखाली शिशुविहार येथे मतमोजणी करण्यात आली मतदानापुर्वीच तीन जागा आवताडे गटाला बिगर कापूस उत्पादक मतदार संघातुन बबनराव आवताडे, सिध्देश्वर आवताडे, दिलीप सावंत हे बिनविरोध निवडले होते. स्व बंडू लाळे यांनी 23 वर्षापुर्वी स्थापन केलेल्या या संस्थेवर लाळे गटाचेच वर्चस्व होते.यंदा पहिल्यांदाच निवडणूक लागली. आणि प्रतिष्ठेचीही झाली अंतीम टप्प्यात आरोप प्रत्यारोपही झाले. ती संस्थेवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न विरोधी गटांनी केला असला तरी मतदारांचा कौल मात्र सत्ताधारी गटावरच या निकालावरुन कायम राहिल्याचे दिसून येते. या निकालानंतर लाळे गटांनी शहरात फटाक्याची आतीषबाजी करत मोठा जल्लोष साजरा केला शहरात विविध ठिकाणी फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत वाजत गाजत शहरातील प्रमुख देवताचे आशिर्वाद घेतले आ.भालके यांच्या कार्यालयातही जल्लोष साजरा करत व्यकंट भालके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

उमेदवार निहाय पडलेली मते कापुस उत्पादक मतदार संघ निलकंठ बसनाळे (1180), मच्छिद्र चौगुले (1226), बाळासो जांभळे (1166 ), उमाशंकर कनशेट्टी (1146), दत्तात्रय लाळे (1204), अभंगा लेंडवे (1294), जालींदर माने (1164 ) बाबासाहेब पाटील (1163),  महादेव सोमंगोंडे (1166), अनु जाती मतदारसंघ भारत शिंदे  (1392), भटक्या व विमुक्त जाती मतदारसंघ बापू गरंडे (1318) इतर मागासवर्गीय मतदार संघ शिवलिंग स्वामी (1270), महिला राखीव मतदार संघ रखमाबाई गरंडे (1251), रूक्मीणी कौडूभैरी (1247)  

स्व. प्रदीप लाळे यांच्या प्रयत्नातून गोळा केलेले भागभांडवल व मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी या निवडणूकीत सभासद व कार्यकर्तेनी आहोरात्र कष्ट घेतले आणि पुनश्च संधी दिली. जो पर्यंत स्मारक आणि वास्तु उभी रहात नाही तोपर्यंत फेटा बांधणार नाही.
- दत्तात्रय लाळे, पॅनेलप्रमुख

Web Title: Mangalwedha cotton meal election