मंगळवेढयातील राष्ट्रवादीमध्ये अजूनही समन्वयाचा अभाव

मंगळवेढयातील राष्ट्रवादीमध्ये अजूनही समन्वयाचा अभाव

मंगळवेढा : राज्यातील भाजपाच्या सत्तेविरुध्द हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रवादीने रान उठवित हे आंदोलन पश्‍चिम महाराष्ट्रात सुरु झाले, पण मंगळवेढयातील राष्ट्रवादीमध्ये अजूनही समन्वयाचा अभाव असल्याने पक्षवाढीस अडथळा ठरत आहे. यांचा पक्षवाढीला लाभ घेण्याच्या दृष्टीने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घालणे आवश्यक बनले आहे.   

सोशलमिडीयात हल्लाबोल आंदोलनाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली यात प्रमुख पदाधिकारीच गायब असल्याचे दिसून आले. यामध्ये तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, युवक अध्यक्ष राज्यात शिवसेना भाजपाचे वादळ असताना पालिकेवर राहूल शहा यांच्या नेतृत्वाखाली सत्ता मिळविली. अन्य ठिकाणी सत्ता मिळविण्यात राष्ट्रवादी अपयशी ठरली असली तरी विधानसभा निवडणूकीला दिड वर्षाचा अवधी असताना राष्ट्रवादी महाराष्ट्रात हल्लाबोल आंदोलनातून भाजपा व शिवसेन विरोधात वातावरण तयार करण्यास सुरुवात केली.

हे आंदोलन विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रानंतर आता पश्‍चिम महाराष्ट्रात सुरू झाले. याची ग्रामीण भागातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला माहिती नाही. मंगळवेढा हा राष्ट्रवादीचा स्थापनेपासूनचा बालेकिल्ला पण 2009 च्या विधानसभेपासून या बालेकिल्ल्याला गेलेले तडे बुजवण्यात पक्षनेतृत्वाने म्हणावे तसे प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे पक्ष तालुक्यात उभारी घेवू शकला नाही.

अलिकडच्या काळात राष्ट्रवादीने ग्रामीण भागातील लोकांशी संपर्कच तोडल्यामुळे 39 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत फक्त गोणेवाडी व येड्राव या दोन ग्रामपंचायती ताब्यात आल्या. राष्ट्रवादीने तालुक्यात प्रभावी एकही आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, दुष्काळ निधी पासून फळबाग असलेल्या शेतकऱ्याला वगळले, कमी दाबाने वीजपुरवठा व वाढवलेली विजबिले, यावर आंदोलन केले नाही.

काही दिवसांपूर्वी तहसील कार्यालयावर काढलेल्या मोर्चात 25 ते 30 कार्येकते सहभागी झाले होते. एकूणात राष्ट्रवादीपासून कमी झालेला संपर्क वाढविण्यासाठी सक्रीय आणि कार्यक्षम पदाधिकाऱ्यांकडे नेतृत्व देणे आवश्यक आहे. शहरात राष्ट्रवादीचे काम प्रभावी असून नगराध्यक्ष अरुणा माळी यांनी देखील चांगले काम केले शहराध्यक्ष असलेले पती सोमनाथ माळी व सागर केसरे यांनी नव्या शाखेच्या माध्यमातून कार्यकर्ते जोडले. तालुकाध्यक्षांनी तालुक्यातील नवीन शाखा काढल्याचे ऐकावात नसल्याचे कार्यकर्ते बोलू लागले. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षाबरोबर असलेले लक्ष्मण ढोबळे हे पक्षापासून दुर आहेत. त्यामुळे नेतृत्व राहूल शहा कडे आहे शहा शहरात प्रभाव असला तरी ग्रामीण भागातून पक्षाला उभारी देणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे पक्ष याकडे किती गांभीर्याने घेते यावर पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com