मंगळवेढा राष्ट्रवादी शहर व ग्रामीण कार्यकरणी जाहीर

हुकूम मुलाणी
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

मंगळवेढा - गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या मंगळवेढा राष्ट्रवादी काँग्रेस शहर व ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांची जंबो कार्यकारणी निवड करताना सर्व जाती धर्माला यात संधी देण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजित जगताप व तालुकाध्यक्ष सुनील डोके यांनी संयुक्तीक पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
 सदरच्या निवडी खा.विजयसिं मोहिते पाटील, अध्यक्ष दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या सल्ल्याने केल्या आहेत.

यावेळी नगरसेवक प्रवीण खवतोडे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष भारत बेंदरे, विधानसभा मतदार संघ अध्यक्ष अमोल माने आदी उपस्थित होते. तालुका कार्यकारणीत कार्याध्यक्ष गोविंद भोरकडे, उपाध्यक्ष विक्रम यादव, बिभीषण बाबर, प्रकाश यलपले, नाथा काशीद, सरचिटणीस गोवर्धन पवार, नागेश स्वामी, सचिन घुले, संदीप पवार, सहसरचिटणीस सुनील लोखंडे, अनिल पाटील, महादेव इरकर, चिटणीस दुर्योधन कसबे, रामचंद्र खांडेकर, प्रसिद्धी प्रमुख ज्ञानेश्वर भंडगे, संघटक नागेश पाटील, खजिनदार आण्णासो नांगरे, सह कार्याध्यक्ष आब्बास मुलाणी, सहसंघटक सुभाष गोडसे, सदस्य हरिशचंद्र राठोड, तुकाराम चव्हाण आदींना संधी देण्यात आली. तर शहर कार्यकारणीत-कार्याध्यक्ष सोमनाथ बुरजे, सहकर्याध्यक्ष स्वप्नील पवार, उपाध्यक्ष विजय गायकवाड, महादेव मुदगुल, मुझमील काझी, बशीर बागवान, विक्रम आवघडे, खजिनदार कांतीलाल दत्तू, संघटक सदाम मकानदार, सरचिटणीस संजय माळी, कुंदन बेदरे, विक्रम भगरे, प्रशांत गायकवाड, सहचिटणीस सुभाष दरवाजकर, सतीश हजारे, बिभीषण माने,सहखजिनदार अविनाश गुंगे, चिटणीस चेतन सुरवसे, प्रवीण ताड, सुहास गडेकर, दादा नागणे, गणेश ओमने, सदस्य गबार आतार, परशुराम जाधव व प्रसिद्धी प्रमुख म्हणून चंद्रकांत चेळेकर यांना संधी देण्यात आली.

राष्ट्रीय अध्यक्ष ना.पवाराचे विचार तळागाळात नेण्यासाठी जनतेच्या प्रश्नांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याच्या सर्वच घटकाना कार्यकारणीत संधी दिली असून याचा पक्षवाढीस निश्चितच लाभ होईल. अजित जगताप शहराध्यक्ष

Web Title: mangalwedha - rashtrwadi congress working committee