मंगळवेढ्याचा पाणीप्रश्न लवकरच मार्गी - संजय पाटील

हुकूम मुलाणी 
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

मंगळवेढा - यंदा हिवाळ्यातच दुष्काळी परिस्थिती  उदभवल्याने मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील शेतकऱ्यांचे डोळे म्हैसाळच्या पाण्याकडे लागले आहेत. सनमडीजवळ 11 मीटर कालवा अडवलेल्या शेतकऱ्यांची समजूत काढून लवकर हे पाणी मंगळवेढ्याला देण्यासाठी प्रयत्न करू असे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पाटील यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले. 

मुळात जत तालुक्यापर्यन्त असणाऱ्या या योजनेत मंगळवेढ्याचा समावेश 1996 मध्ये युती शासनाने केला. तेव्हापासून झालेल्या निवडणुकित म्हैसाळच्या पाण्याने आशा पल्लवित करण्यात आल्या. मुळातच म्हैसाळच्या  योजनेत तलावात पाणी सोडण्याची तरतूद नाही. मात्र सहा हजार हेक्टरला पाणी देण्याचे प्रास्तावित आहे. तरीही सोशल मिडीयासह सर्व ठिकाणी पाणी सोडण्याची मागणी मान्य केल्याचे फोटो व निवेदने झळकली. पण पाणी कधी येणार याची मात्र या भागाला प्रतिक्षाच राहिली. 

या योजनेस यंदा पंतप्रधान सिंचन योजनेतून 2100  कोटीचा निधी अलिकडच्या दोन वर्षात प्राप्त होऊन काम वेळत पुर्ण करण्याचे बंधन घातल्याने ठेकेदाराने अहोरात्र कष्ट घेतल्याने कामास गती आली. त्यामुळे या योजनेचे पाणी या भागास यापुढील सहा महिन्यापासून मिळणार असल्याने दुष्काळी तीव्रता कमी होवू शकणार आहे. कमी काळात जलसेतुचे काम पूर्ण केले त्यामुळे या योजनेचा लाभ मिळण्याची परिस्थिती निर्माण झाली. 

वायफळ ते निगडी जलसेतु तसेच सनमडीजवळ दोन तीन शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याबरोबर ज्या ठिकाणी अडथळा आहे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना पोलीस सरंक्षण घेवून काम करावे लागणार होते पण यात जतचे आ.विलास जगताप व सुनिल पवार यांना या अडवलेल्या  शेतकऱ्यांची समजूत काढून पुढील गावाला पाणी मिळण्याचा मार्ग सुकर करण्याच्या सुचना दिल्या असल्याचे संजय पाटील यांनी सांगितले..

Web Title: mangalwedha's water problem will be solved soon - sanjay payil