मंगळवेढा - 19 गावांमध्ये बसविण्यात आले हायमास्ट दिवे 

हुकूम मुलाणी
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

मंगळवेढा - जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून तालुक्यातील 19 गावांना हायमास्ट दिवा बसविण्यासाठी तीस लाखाचा निधी मंजूर करण्यात आला असून, या गावात हे दिवे बसविण्यात आले असल्याची माहिती सभापती प्रदीप खांडेकर यांनी दिली

दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधाना आवताडे, जि.प.च्या समाजकल्याण सभापती शिला शिवशरण, जि.प.सदस्या मंजुळा कोळेकर, जि.प.सदस्य दिलीप चव्हाण, यांच्या प्रयत्नाने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करुन हायमास्ट दिव्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला असून बसविण्यात आलेले दिवे सार्वजनिक ठिकाणच्या मुख्य चौकात बसविल्यामुळे ही गावे उजेडाने लखलखणार आहेत. यामध्ये भाळवणी, भालेवाडी, मरवडे, कर्जाळ, डोणज, हुलजंती, पाठखळ, अकोला, आंधळगाव, जालीहाळ, हाजापुर, हिवरगाव, हिवरगाव, जंगलगी, महमदाबाद, लोणार, पडोळकरवाडी, शेलेवाडी, चोखामेळा नगर, या गावात हे दिवे बसविण्यात आले. भविष्यात राहिलेल्या गावांनाही हायमास्ट दिवे बसविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

Web Title: Mangleda - highmast lights set in 19 villages