मंगळवेढा ते निंबोणी रस्त्यावर आणखी किती बळी जाणार?

mangawedha
mangawedha

मंगळवेढा : मंगळवेढा ते निंबोणी रस्त्यावरील कमी रुंदी आणि रस्त्यावरील खडडे यामुळे या मार्गावरील वाहतूक जीवघेणी होत असून यात अनेकांचे बळी तर गेलेले आहेत पण सार्वजनिक बांधकाम खाते आणखी किती बळीची वाट पाहणार असा सवाल वाहनधारकामधून विचारला जात आहे.
        
रत्नागिरी नागपूर या महामार्गाच्या कामाचा मंगळवेढा परिसरातील ठेका घेतलेल्या दिलीप बिल्डकॉन या कंपनीचे वाहनतळ देखील मंगळवेढयापासून तीन किमी अंतरावर असून महामार्गाचे काम सुरु झाल्यावर मोठया प्रमाणात अवजड वाहतूक कमी रुंदीच्या या रस्त्यावरुन जाणार आहे. मंगळवेढा ते उमदी या महामार्गाचे काम सध्या सुरु असल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक सध्या जवळचा पर्यायी मार्ग म्हणून मंगळवेढा ते निंबोणी या मार्गावरुन जात आहे. शिवाय भैरवनाथ कारखान्याचा गाळप हंगाम सुरु झाल्यामुळे या कारखान्याची ऊस वाहतूकही याच मार्गावरुन जातात. सध्या या रस्त्यावर अनेक ठिकाणी खडडे पडले असून एक खडडा चुकविण्यासाठी दुसऱ्या खडडयात जावे लागत आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या फिरंगीच्या झाडे देखील त्रासदायक ठरु लागली आहेत. शिवाय या रस्त्यावरील साईड पट्टीही खचल्यामुळे अवजड वाहन आल्यावर दुचाकीस्वाराला साईडपट्टीला घेताना अपघात होण्याची शक्यता आहे. शिवाय टॅक्टरला ओव्हरटेक देखील करता येत नाही.

गत पंधरा दिवसापुर्वी अवजड वाहनास साईड देताना सासू सुनेचा जागीच मृत्यू असून यापुर्वी या खराब रस्त्यामुळे पाच जणाला आपला जीव गमगावा लागला आहे. खराब आणि कमी रुंदीचा रस्ता यामुळे भविष्यात आणखी अपघात होण्याची शक्यता नाकाराता येत नाही. दरम्यान या रस्त्याचा कामासाठी 4 कोटीचा निधी मंजूर झाल्याची चर्चा असून त्यामुळे कुणाचा तरी बळीची वाट न बघता सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्ता दुरुस्तीसह रूंदीकरणाचे काम तातडीने सुरु करावे अशी मागणी होत आहे.

''रस्ता खराब असतानाही लहान मोठी वाहने भरधाव येत असून याच मार्गावरील भाळवणी येथे प्राथमिक व माध्यमिक शाळेसमोर गतीरोधक तातडीने करावा अन्यथा आंदोलन करणार आहे.''
-  अमोल गायकवाड, तालुका उपाध्यक्ष, अखिल भारतीय छावा संघटना

''
या रस्त्याचे काम मंजूर असून चार कोटीचे अंदाजपत्रक तांत्रिक मंजुरीस पाठवले असून महिना अखेरीस मंजूरी मिळेल.
- बाबुराव राठोड, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com