आंबा आला रे ऽऽऽ.. मोसमाआधीच आंबा सांगलीत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मार्च 2017

सांगली - फळांचा राजा आंबा सांगलीत दाखल झाला आहे; पण मोसमाआधीच आवक असल्यामुळे आंब्याचा दर प्रतिडझन ८०० ते १२०० रुपये इतका आहे. 

फेब्रुवारीच्या अखेरीस आंबा मुंबई बाजारात येतो. यंदा कोकणातील हवामान आंबा पिकाला पोषक ठरले. कोकणात आंब्याच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे यंदा १५ दिवस आधीच सांगलीत आंबा दाखल झाला आहे. देवगडी हापूस आंबा ८००ते १२०० रुपये पायरी ४०० ते ५०० रुपये, रत्नागिरी हापूस ७००ते ८०० रुपये, पायरी ४००ते ५०० रुपये, कर्नाटकी आंबा ५००ते ६०० रुपये, पायरी ३००ते ४०० रुपये असे आंब्याचे दर आहेत.   

परराज्यातून सांगलीत आंबा दाखल झाला असला तरी त्याचा दर सर्वसामान्य लोकांना न परवडणारा आहे. सावंतवाडी, देवगड, मालवण, कुडाळ येथून आंबा सांगलीत येतो. आठवड्याभराने आवक वाढण्याची शक्‍यता आहे. देवगड, रत्नागिरी मागणी आहे. स्थानिक आंब्याच्या जातीमध्ये तोतापुरी, नीलम, बागेपल्ली, अमरापुरी, मलिका, लागरा यांना मागणी असते; पण हा आंबा उपलब्ध होण्यासाठी अजून महिन्याभराचा कालावधी आहे. 

महाराष्ट्रातून आंबा येत आहे. कोकण, देवगड व कर्नाटकचा आंबा सांगलीत आलाय; पण आवक कमी असल्यामुळे दर जास्त आहे. काही दिवसांत आवक वाढल्यानंतर दर कमी होतील.
-अल्ताफ बागवान, फळ व्यापारी.

Web Title: mango in sangli