मांजरी : सोयाबीनवर नांगर फिरविण्याची वेळ

प्रत्येक शेतकऱ्याने सर्रास उन्हाळी सोयाबीनची लागवड केली आहे. गत वर्षी उन्हाळ्यात मिळालेला उच्चांकी दर, पावसाळ्यात कृष्णानदीला आलेला पूर, अतिवृष्टीमुळे संपुर्ण पीक वाया गेले होते.
मांजरी : सोयाबीनवर नांगर फिरविण्याची वेळ
Summary

प्रत्येक शेतकऱ्याने सर्रास उन्हाळी सोयाबीनची लागवड केली आहे. गत वर्षी उन्हाळ्यात मिळालेला उच्चांकी दर, पावसाळ्यात कृष्णानदीला आलेला पूर, अतिवृष्टीमुळे संपुर्ण पीक वाया गेले होते.

- तात्यासाहेब कामत

मांजरी - कृष्णा काठासह चिक्कोडी तालुक्यात जास्त दराच्या आशेने उन्हाळी सोयाबिनची (Soybean) लागवड १०० वरून ८०० हेक्टरपर्यंत केली होती. मात्र काही ठिकाणी फुलकळी न आल्याने त्याच्यावर नांगर फिरविण्याची वेळ आली आहे. उत्पादनात (Production) घट आल्याने मांजरी परिसरात हे विदारक चित्र दिसत आहे.

प्रत्येक शेतकऱ्याने सर्रास उन्हाळी सोयाबीनची लागवड केली आहे. गत वर्षी उन्हाळ्यात मिळालेला उच्चांकी दर, पावसाळ्यात कृष्णानदीला आलेला पूर, अतिवृष्टीमुळे संपुर्ण पीक वाया गेले होते. गतवर्षी प्रायोगिक तत्वावर कृषी विभागाने पुढाकार घेऊन १०० हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीन लागवड केली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांनी जिद्दीने उन्हाळी सोयाबीनची लागवड करून चांगले उत्पादन घेतले होते. त्याला १० हजार रुपयापर्यंत दर मिळाला होता. त्यामुळे सोयाबीनला बियाणासाठी चांगली मागणी होती. यंदा अनेक शेतकरी सोयाबीन लागवडीकडे वळला. यंदा साधारण ८०० हेक्टर सोयाबीनची लागवड झाल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे. सोयाबीनला सध्या सात हजारापर्यंत दर मिळत आहे. परंतु यंदा मार्च महिन्यापासूनच तापमानात वाढ झाल्याने सोयाबीन पिकास फुलकळी येण्याचे प्रमाण घटले. फुलकळी येण्याचा कालावधी संपत आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

यंदा तापमाणात वाढ झाली आहे. उन्हाळी सोयाबीन पिकासाठी काही ठिकाणी नत्राचा वापर जास्त झाला आहे. दोन ओळी व रोपातील अंतर जवळ झाले. बियाणांची बीज प्रक्रिया न केल्याने रासायनिक व किटनाशकांच्या फवारण्या जास्त झाल्याची शक्यता आहे. त्या सोयाबीन पिकाची वाढ झाली. परंतु फुलकळी कमी प्रमाणात आली आहे.

- मंजुनाथ जन्मट्टी, कृषी अधिकारी, चिक्कोडी

दर मिळण्याच्या आशेने उन्हाळी सोयाबीनची लागवड केली. वेळेवर पाणी, फवारणी, खते दिली आहेत. कालावधी संपत आला तरी अजूनही फुलकळीचा पत्ता नाही. त्यामुळे 8 एकर उभ्या पिकावर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे.

- सत्याप्पा कबाडे, इंगळी, शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com