विठुरायाचा आशीर्वाद आहे म्हणूनच पुन्हा पंढरपुरात आलो : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला धरुन गेल्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आषादी एकादशीची पंढपुरातील पूजा रद्द झाली होती. या वर्षी मात्र, त्यांनी सपत्नीक विठुरायाच्या चरणी आपला माथा टेकवत त्याची पूजा केली. त्यानंतर मराठा समाजाने त्यांचा सत्कारही केला. 

पंढरपुर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला धरुन गेल्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आषादी एकादशीची पंढपुरातील पूजा रद्द झाली होती. या वर्षी मात्र, त्यांनी सपत्नीक विठुरायाच्या चरणी आपला माथा टेकवत त्याची पूजा केली. त्यानंतर मराठा समाजाने त्यांचा सत्कारही केला. 

''गेल्या वर्षी विठुरायाची पूजा करण्याची संधी मिळाली नाही मात्र, विठुरायाचा आशीर्वाद आहे म्हणूनच पुन्हा पंढरपुरात आलो. मराठा समाजाने केलेल्या सत्काराबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मराठा आरक्षणाला मंजूरी दिल्याने मराठा समाजाला माझा मोठा सत्कार करायचा होता मात्र, त्यास मीच नकार दिला. राज्यकर्ता म्हणून मी फक्त माझं कर्तव्य पार पाडलं आहे. जनभावनेचा आदर करुन राज्याचा कारभार करण्याची शिकवण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आहे. त्यांच्याच शिकवणीनुसार मी जनभावना ओळखून काम करत आहे. मराठा समाजाच्या जनभावनेचा आदर कररुन आम्ही गेली दोन तीन वर्ष या आरक्षणासाठी झगडत होतो. सगळे कायदेशीर अडथळे पार करुन आम्ही आरक्षण देऊ शकलो याचं मला समाधान आहे,'' असे मत त्यांनी व्यक्त केले. 

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही

''मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाला अशी भीती होती की आमच्या आरक्षण राहिल की नाही मात्र, त्यांच्या आरक्षणाला कोठेही धक्का न लावता मराठा समाजाला हे आरक्षण देण्यात आले आहे.'' असे त्यांनी स्पष्ट केले. 

अजूनही बरंच काम करायचं आहे

''पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला प्रत्येक वेळी पाठींबा दिला आहे. त्यांच्या पाठींब्यामुळेच आम्ही हे सारं करु शकलो. अनेक गोष्टी राहिल्याही आहेत, त्याही करु,'' असे आश्वाशन त्यांनी यावेळी दिले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Community felicitates Devendra Fadnavis in Pandharpur