Sangli News: लग्नात ‘ऋण काढून सण’ टाळा: मराठा समाजाचा निर्णय; २०० वऱ्हाडी, हुंडा नको, समाजाची आचारसंहिता जाहीर
Maratha Community Introduces Wedding Code : पुण्यात हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवी हगवणे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजात लग्नात हुंडा पद्धतीस कडाडून विरोध करण्याबाबत एकमत झाले. या परिस्थितीत आपण समाज म्हणून बदल घडवला पाहिजे आणि त्यासाठी आचारसंहिता करावी लागेल, तेच उत्तर असेल, याबाबत सर्वांचे एकमत झाले.
Maratha community leaders at a press meet announcing the new marriage code for simple, debt-free weddings.Sakal
सांगली : ‘मराठा समाजाने अनिष्ट रुढी-परंपरांच्या जोखडातून मुक्त व्हावे,’ ‘लग्न अधिकाधिक २०० वऱ्हाडींच्या उपस्थितीत करा,’ ‘हुंडा देऊ अन् घेऊ नका’, ‘ऋण काढून सण करणं टाळा’, असे विविध ठराव मराठा समाज समन्वय समितीच्या बैठकीत आज पारित करण्यात आले.