कऱ्हाड - कृष्णा नदीत उतरून मराठा समाजाच्या वतीने आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी शुक्रवारी कराडच्या कृष्णा नदीपात्रात उतरून मराठा समाजाची मराठा समाजाच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले. 

कऱ्हाड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी शुक्रवारी कराडच्या कृष्णा नदीपात्रात उतरून मराठा समाजाची मराठा समाजाच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले. 

अचानक सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा इशारा मराठा समाजाच्या वतीने आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. शांततेच्या मार्गाने लढा देऊन आरक्षण मिळत नसेल तर यापुढे लढा तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. या घटनेमुळे पोलिस व प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maratha kranti morcha agitation at krishna river