माढ्यात जेलभरो आंदोलन

किरण चव्हाण 
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

माढा (सोलापूर) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी बुधवारी (ता.1) सकल मराठा समाजातील लोकांनी माढयात जेलभरो आंदोलन केले. 

माढा (सोलापूर) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी बुधवारी (ता.1) सकल मराठा समाजातील लोकांनी माढयात जेलभरो आंदोलन केले. 

माढयातील ठिय्या आंदोलनानंतर सकल मराठा समाजाने आंदोलनाची दिशा बदलली असून बुधवारी (ता.1) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. जेलभरो आंदोलनास मोठा पाठिंबा मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पोलिसांच्या वाहनातून आंदोलकांना माढा पोलिस ठाण्यात नेण्यात आले. आंदोलकांची संख्या जास्त असल्याने पोलिसांची वाहने कमी पडली. अनेक आंदोलकांनी स्वत:हून पोलिस ठाण्यात जावून अटक करून घेतली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाची मागणी केली. आंदोलकांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजासह इतर समाजातील लोकांनीही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अटक करून घेण्यासाठी गर्दी केली. 

माढयातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महिलांनीही मोठी गर्दी केली होती. 
माढा तहसील कार्यालयासमोर आरक्षणाच्या मागणीसाठी आठ दिवस ठिय्या आंदोलन झाले असून तालुक्यातील सकल मराठा समाजाने मराठा आरक्षणासाठी ठोक मोर्चा, तहसिल कार्यालयाचे कामकाज बंद, मुख्यमंत्र्याच्या प्रतिकात्मक पुतळयाची अंत्ययात्रा, जेलभरो आंदोलन यासारखी आंदोलने केली आहेत. मराठा आरक्षणासाठी तालुक्यातील सकल मराठा समाज यापुढेही आंदोलन सुरु ठेवणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Web Title: Maratha Kranti morcha agitation in madha