सीमा प्रश्‍नासाठी लक्ष द्यावे; मराठा मेळाव्यात मागणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

बेळगावमध्ये गुरूवारी (ता.16) होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर छत्रपती शाहू स्मारक भवन येथे ओयोजित मेळाव्यात अनेक मान्यवरांनी आपली भूमिका मांडली.

कोल्हापूर - सीमा प्रश्‍नाबाबत उच्च न्यायालयात दावा सुरू आहे. महाराष्ट्र शासनाकडून एकही प्रतिनिधी या सुनावणीला उपस्थित रहात नाही, अशी खंत आज शाहू स्मारक भवन येथे झालेल्या मराठा समाज मेळाव्यात व्यक्त करण्यात आली.

कोल्हापूर-बेळगाव हे भाऊ-भाऊ आहेत. बेळगावमधील मराठी लोकांवर अन्याय झाल्यानंतर कोल्हापूरमध्येच ठिणगी पेटेत आज राजकीय पातळीवरही अशी ठिणकी पेटली पाहिजे. यासाठी उच्चन्यायालयातील सुनावणीला शासनाच एकतरी प्रतिनिधी उपस्थित राहिला पाहिजे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना महाराष्ट्र- कर्नाटकचे समन्वयक म्हणून नियुक्ती आहे. त्यांनीच यामध्ये जोर घ्यावा, अशीही अपेक्षा आज मान्यवरांनी व्यक्त केली. 

बेळगावमध्ये गुरूवारी (ता.16) होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर छत्रपती शाहू स्मारक भवन येथे ओयोजित मेळाव्यात अनेक मान्यवरांनी आपली भूमिका मांडली.

Web Title: maratha kranti morcha held in belgaum