करमाळा तालुक्यात जागरण गोंधळ करून निषेध

अण्णा काळे
बुधवार, 25 जुलै 2018

करमाळा : मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून करमाळा शहरातुन शासनाच्या निषेधार्थ बोकडाच्या आंगावर व गळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे फोटो लावुन जागरण गोंधळ मोर्चा काढण्यात आला. पोथरी नाका ते तहसील कार्यालय पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोतराज नाचवत मुख्यमंत्र्यांचे फोटो लावलेले बोकड व हलगी च्या गजरात मोर्चा काढण्यात आला.

पंढरपूरच्या वारी च्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी येण्याचे टाळल्या नंतर केलेल्या वक्तव्याचा निषेध या वेळी करण्यात आला. सकाळी साडेनऊ वाजता शहरातील पोथरे नाका येथून शेकडो आंदोलनकर्त्यांनी पोतराज, हलगी, बोकड, तुतारी व पिपाणी अशा सर्व जागरण गोंधळ घालण्याच्या निमित्ताने एकत्र झाले होते. यावेळी बोकडाला मुख्यमंत्री फडवणीस यांचे पोस्टर चिटकुले होते. यावेळी हा मोर्चा जय महाराष्ट्र चौक, छत्रपती चौक, आंबेडकर पुतळा ते तहसील कार्यालय पर्यंत नेण्यात आला .यावेळी आंदोलकांच्या यवतीने गोदावरी नदी जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत मुख्यमंत्र्यांना यासाठी जबाबदार धरत त्यांच्यावर 302 गुन्हा दाखल करावा म्हणून 302 सह्यांचे निवेदन तहसीलदार संजय पवार यांच्याकडे देण्यात आले.

करमाळा तहसील कार्यालयासमोर मराठा आरक्षणासाठी ता. 21 जुलैपासून ठिय्या आंदोलन सुरु असून या चार दिवसात दोन वेळा करमाळा शहर व तालुका बंद ठेवण्यात आला होता. आज तालुक्यातील कोर्टी,वाशिंबे भागात कडकडीत बंद पाळण्यात आला.

Web Title: maratha kranti morcha at karmala