Maratha Kranti Morcha :मुंडन करुन निषेध व्यक्त

राजकुमार शहा 
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

मोहोळ : मराठा आरक्षणाच्या मागणी साठी मोहोळ शहरासह तालुक्यातील ग्रामिण भागात बंद पाळण्यात आला कुठेही अनुचीत प्रकार घडला नाही. मराठा आरक्षण मागणीची धग ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात दिसुन आली राज्य मार्ग व महामार्गाच्या कडेच्या गावातील  सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यानी रस्त्यावर टायर पेटवुन घोषणा बाजी करून सरकारचा निषेध केला. यात युवकांचा समावेश मोठ्या प्रमाणात दिसुन आला लांबोटी चिखली हिवरे या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला त्यामुळे कांही काळ वाहतुक खोळंबली होती.

मोहोळ शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला तहसील आवाराबाहेर सकल मराठा समाजाच्या कांही युवकांनी मुंडन करुन निषेध व्यक्त करुन घोषणा बाजी केली मोहोळ पोलिस ठाण्याचे नुतन पोलीस निरीक्षक कोकणे यांनी बंदच्या पार्श्वभुमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता त्यात शेटफळ सावळेश्वर टोलनाका अनगर फाटा टाकळी सिकंदर पेनूर सारोळे आदी सह अन्य संवेदनशील भागात पोलीस पॉईंट लावले होते बंदोबस्तात साठ पोलीस कर्मचारी सेहेचाळीस होमगार्ड सात अधिकारी  सात पोलीस पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती तर एक स्ट्रायकिंग फोर्स व फिरते पोलिस पथक कार्यरत होते तालुक्यात कुठेही अनुचीत प्रकार घडला नसल्याचे पोलिस प्रशासनाकडुन सांगण्यात आले.

Web Title: Maratha Kranti Morcha : maratha agitation in mohol