Maratha Kranti Morcha : टिकणारे आरक्षण देणार... - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

सांगली - ‘मराठा समाजाला तकलादू नाही, तर टिकणारे आरक्षण आम्ही देणार आहे. मराठा आरक्षणाचा इतिहास लिहिताना मुख्यमंत्री आणि माझ्यावर चार-चार पाने लिहावी लागतील,’ असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. 

सांगली येथे जिल्हा प्रशासनातर्फे मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाचे उद्‌घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. वसतिगृहात ६० विद्यार्थी क्षमता आहे. 

राज्यात आतापर्यंत १० वसतिगृह सुरू झाली आहेत. सांगली जिल्ह्यात उभारलेले हे पाहिले वसतिगृह आहे. खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ,  आमदार शिवाजीराव नाईक, आमदार विलासराव जगताप, आमदार अनिल बाबर, आमदार सुरेश खाडे, झेडपीचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील प्रमुख उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले,‘‘मराठा आरक्षणासाठी यापूर्वी ‘सकस’ प्रयत्न झाले नाहीत, त्यामुळे प्रश्न लटकत  राहिला. खानदेशातील मराठा लोकांनी ज्यावेळेस आपण कुणबी असल्याचे लावून घेतले त्यावेळेस पश्‍चिम महाराष्ट्रतील मराठा नेत्यांनी आपण कुणबी मराठा लावण्यास नकार दिला. नाहीतर १९६८ मध्येच हा प्रश्न सुटला असता. आयोगाचाही वेळेत अहवालाचे प्रयत्न आहे.’’

महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी प्रास्ताविक केले. इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, वैभव शिंदे, डॉ. संजय पाटील, विलास देसाई, नितीन चव्हाण, ॲड. उत्तमराव चव्हाण, आशा पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, त्रिगुण कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत उपस्थित होते.

माझ्या खिशात तीन कार्ड
चंद्रकांत पाटील  म्हणाले, ‘‘आरक्षणाबाबत काही लोक दिशाभूल करीत आहेत, परंतु माझ्या खिशातील तीन कार्ड काढल्यास विरोधकांसाठी २०१९ ची निवडणूक संपेल. ज्या मराठा विद्यार्थ्यांनी १०० टक्के फी भरली असेल त्यांची ५० टक्के फी परत देणार असून, उद्याच्या कॅबिनेटमध्ये याबाबतचा जीआर काढणार आहे. ’’

Web Title: maratha kranti morcha maratha reservation agitation CHandrakant Patil