Maratha Kranti Morcha : आरक्षणाची लढाई कायद्याने लढा - पुरुषोत्तम खेडेकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

सांगली - सरकारने टाकलेल्या चक्रव्युहात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला रस्त्यावरच्या लढाईत यश मिळण्याची शक्‍यता नाही. ५० टक्‍क्‍यांचा कोटा ओलांडून आरक्षण देणे अशक्‍य आहे. त्यासाठी रस्त्यावर न लढता कायद्यानुसार वाटचाल करणे गरजेचे आहे. ‘ओबीसी’मध्ये मराठ्यांचा समावेश केल्यासच आरक्षण देणे शक्‍य आहे, असे मत मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी येथे बोलताना व्यक्त केले.

सांगली - सरकारने टाकलेल्या चक्रव्युहात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला रस्त्यावरच्या लढाईत यश मिळण्याची शक्‍यता नाही. ५० टक्‍क्‍यांचा कोटा ओलांडून आरक्षण देणे अशक्‍य आहे. त्यासाठी रस्त्यावर न लढता कायद्यानुसार वाटचाल करणे गरजेचे आहे. ‘ओबीसी’मध्ये मराठ्यांचा समावेश केल्यासच आरक्षण देणे शक्‍य आहे, असे मत मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी येथे बोलताना व्यक्त केले.

श्री. खेडेकर सांगली दौऱ्यावर आले होते. मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन येथे त्यांनी जिल्ह्यातील संघटनेचा आढावा घेतला. त्यानंतर ‘आरक्षण : भूमिका व सद्यस्थिती’ या विषयावर मार्गदर्शन केले. खेडेकर म्हणाले, की मराठा सेवा संघ सुरवातीपासून मराठा क्रांती मोर्चापासून दूर आहे.

कोणत्याही आंदोलनाला नेतृत्व असणे आवश्‍यक आहे. त्याशिवाय यश मिळत नाही. मराठा क्रांती मोर्चात त्याचा अभाव असल्यानेच सरकार लाभ उठवत आहे. 

कोणतेही सरकार राजकीय फायदा पाहत असते. आरक्षण लढ्यामुळे मराठा समाजाविषयी तिरस्कार निर्माण करण्यात सरकार यशस्वी ठरले आहे. मराठा क्रांती मोर्चाला सरकारने प्रत्यक्षात फारसे न देता कागदावर खूप काही दिले आहे.

ते म्हणाले, की आपला देश लोकशाहीप्रधान असल्याने कायद्यानुसारच वाटचाल करावी लागते. त्यामुळे ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडून कोणालाही आरक्षण देणे शक्‍य नाही. केवळ तमिळनाडू याला अपवाद ठरला आहे. संसदेतील सर्व खासदार जेव्हा संभाजी बिग्रेड विचारसरणीचे होतील, तेव्हाच आरक्षण शक्‍य आहे. मराठा समाजाचा समावेश ‘ओबीसी’मध्ये करावा, अशी मागणी लावून धरली पाहिजे; तर आपल्याला आरक्षण मिळू शकेल. रस्त्यावर लढा उभारून दंगली झाल्यास मराठा समाजच बदनाम होणार आहे. त्यामुळे आरक्षणासाठी कायद्याने लढाई करणे आवश्‍यक असून, यासाठी क्रांती मोर्चाने कोअर कमिटी स्थापन करून लढा उभारणे गरजेचे असल्याचेही खेडेकर यांनी सांगितले.

या वेळी राजेंद्रसिंह पाटील, दिनकर पाटील, संजय देसाई, डॉ. संजय पाटील, सुयोग औंधकर, शेखर परब, आशा पाटील, निर्मला पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.

आरक्षण हे साध्य
पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले, की आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या करण्याच्या भानगडीत पडू नये. मराठा आरक्षण हे आपले साध्य आहे, साधन नाही. त्यामुळे केवळ भावनिक विचार करून चालणार नाही. आर्थिक निकषावर आरक्षण देणे अशक्‍य आहे.

Web Title: maratha kranti morcha maratha reservation agitation Law Purushottam Khedekar