मराठ्यांचा २० ला महाराष्ट्रव्यापी मेळावा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, असे सांगत सरकार मराठ्यांची दिशाभूल करत आहे. यासाठी २० नोव्हेंबरला कोल्हापूरमध्ये मराठ्यांचा महाराष्ट्रव्यापी मेळावा घेण्याची घोषणा करून आरक्षण मिळेपर्यंत मराठ्यांची फौज शक्तीनिशी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरेल, अशा इशाराही आज देण्यात आला. टाऊन हॉल उद्यान येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे विरंगुळा केंद्रात आयोजित मराठा मेळाव्यात हा निर्णय 
घेण्यात आला.   

कोल्हापूर - मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, असे सांगत सरकार मराठ्यांची दिशाभूल करत आहे. यासाठी २० नोव्हेंबरला कोल्हापूरमध्ये मराठ्यांचा महाराष्ट्रव्यापी मेळावा घेण्याची घोषणा करून आरक्षण मिळेपर्यंत मराठ्यांची फौज शक्तीनिशी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरेल, अशा इशाराही आज देण्यात आला. टाऊन हॉल उद्यान येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे विरंगुळा केंद्रात आयोजित मराठा मेळाव्यात हा निर्णय 
घेण्यात आला.   

या वेळी बाळ घाटगे म्हणाले, ‘‘मराठ्यांच्या लाखोंच्या मोर्चाला सरकार प्रतिसाद देत नाही. शांत, शिस्तबद्ध निघालेल्या या मोर्चाकडे दुर्लक्ष करून सरकार अंत पाहत आहे. ॲट्रॉसिटी कायद्यात बदल केला पाहिजे, अशी मागणी असताना अनेकांनी याचा चुकीचा अर्थ लावला आहे. हे चुकीचे आहे. दरम्यान, आमची मागणी शासनाकडे आहे. शासनाने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. मराठा समाज आज मोठ्या संख्येने एकत्र येत रस्‍त्‍यावर उतरत आहे. परंतु सरकार या समाजाच्‍या मागण्याकडे दुर्लक्ष करत असल्‍याचे चित्र आहे. आज प्रत्‍येक टप्प्यावर मराठा समाज पाठीमागे पडत असून त्‍यावर आरक्षण हाच एकमेव उपाय आहे व आरक्षण मिळवण्यासाठी सरकारला सळो का पळाे करून सोडण्याची ताकद 
मराठ्यांच्‍यात आहे.’’  

आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘‘मराठ्यांना आरक्षण देणे म्हणजे सरकारला इगो वाटत आहे. सरकारच्या भूमिकेबाबत २० नोव्हेंबरच्या मेळाव्यात चर्चा केली जाईल. आजपर्यंत शांततेत निघालेल्या या मोर्चाला आव्हान देण्याचा प्रयत्न करू नये. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हा लढा सुरूच राहील.’’ 

मराठ्यांच्या मागण्या त्वरित मान्य करा, अन्यथा महाराष्ट्र पेटेल, असा इशारा देऊन श्री. क्षीरसागर म्हणाले, ‘‘येत्या अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, यासाठी पाठपुरावा केला जाईल.’’ 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे म्हणाले, ‘‘अनेक जण मोर्चे काढत आहेत; पण या मोर्चांना प्रतिमोर्चे असे नाव दिले जात आहे. त्यामुळे वाद होण्याची शक्‍यता आहे, याचाही विचार झाला पाहिजे.

ॲट्रॉसिटीचा सरळ सरळ गैरवापर होत आहे. त्यामुळे या कायद्यात बदल झाला पाहिजे, ही मागणी रास्तच आहे.’’

या वेळी छावा संघटनेचे राजू सावंत, माजी महापौर ॲड. महादेवराव आडगुळे, किशोर घाटगे, दिनेश डांगे, राजेंद्र पाटील, शुभांगी गायकवाड, नंदकुमार मोरे, संजय पाटील (शाहूवाडी), मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीकांत भोसले, प्रकाश सरनाईक, हेमंत पाटील, बाळासाहेब यादव, डॉ. मानसिंग घाटगे, शंकरराव शेळके, प्रताप साळोखे उपस्थित होते.

Web Title: maratha kranti morcha rally