Maratha Kranti Morcha : कोल्हापुरातच ठरली निर्णायक लढ्याची ‘डेडलाईन’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

कोल्हापूर - मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी राज्यभरातून ५८ मोर्चे निघाले, तर ४१ जणांनी आरक्षणासाठी बलिदान दिले. मूक मोर्चानंतर कोल्हापूरकरही ठोक मोर्चाकडे वळले. मुंबईत धडक मारण्याचे नियोजन झाले. याचवेळी पालकमंत्र्यांसह इतरांच्या उपस्थितीत राजर्षी शाहू जन्मस्थळ अर्थात लक्ष्मी-विलास पॅलेस येथे १ सप्टेंबर २०१८ रोजी बैठक झाली. याच बैठकीत ३० नोव्हेंबर ही ‘डेडलाईन’ ठरली. २९ नोव्हेंबरला मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब झाले.

लोक चळवळ म्हणून मराठ्यांचा लढा पुढे आला. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, यासह अन्य मागण्यांसाठी लाखो मराठा बांधव रस्त्यावर उतरले. ४२ जण हुतात्मा झाले. मूक मोर्चानंतर ठोक मोर्चाकडे मराठा समाज वळला. कोल्हापुरातून विधानसभेला घेराओ घालण्याचे नियोजन झाले होते. मात्र, ते थांबविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर मान्यवरांनी त्यामध्ये पुढाकार घेतला. शासकीय विश्रामगृहावर झालेल्या चर्चेनंतर कसबा बावड्यातील राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळी अर्थात लक्ष्मीविलास पॅलेस मध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत सकल मराठा समाजाच्या आंदोलनातील प्रमुखांनी चर्चा केली. तेव्हाच ३० नोव्हेंबरपर्यंत आरक्षण दिले जाईल, ही ‘डेडलाईन’ मिळाली होती. याच डेडलाईनमध्ये आरक्षण देणे हे सरकारसाठी महत्त्वपूर्ण बनले.

Web Title: Maratha Kranti Morcha for reservation