#MarathaKrantiMorcha संयुक्त जुना बुधवार पेठ मराठा बांधवांचा आरक्षणासाठी एल्गार

संदीप खांडेकर
रविवार, 5 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - आरक्षण दिले नाही तर कोल्हापुरी पायताण आणि दिले तर कोल्हापुरी गूळ देऊ, अशी घोषणा करत संयुक्त जुना बुधवार पेठेतील मराठा बांधवांनी आरक्षणासाठी आज एल्गार केला.

कोल्हापूर - आरक्षण दिले नाही तर कोल्हापुरी पायताण आणि दिले तर कोल्हापुरी गूळ देऊ, अशी घोषणा करत संयुक्त जुना बुधवार पेठेतील मराठा बांधवांनी आरक्षणासाठी आज एल्गार केला.

बालगोपाल तालीम मंडळ, लेटेस्ट तरुण मंडळ, ब्राह्मण युवा मंचने दुचाकी फेरी काढून आंदोलनास पाठिंबा दिला. नऊ आॅगस्टपूर्वी आरक्षण मिळाले नाही तर उद्रेक होईल, असा इशारा वक्त्यांनी दिला.

दरम्यान, एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, छत्रपती संभाजी महाराज की जय या घोषणांनी दसरा चौक दणाणून गेला. दिवसभरात विविध संघटनांनी आंदोलनास पाठिंबा देत मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी केली.

साळोखे फाऊंडेशन, बिनखांबी गणेश मित्र मंडळ, शाहू मॅरेथॉन, जीवन ज्योती तरुण मंडळ, शिवाजी विद्यापीठ सेवक संघ, कसबा सांगाव सकल मराठा समाज, कोल्हापूर शहर व जिल्हा अपंग कृती समिती, नागदेव वाडी ग्रामस्थ, कदमवाडी , लेटेस्ट तरुण मंडळ, गिरगाव, कोल्हापूर जिल्हा  जनरल डाॅक्टर्स प्रॅक्टिस असोसिएशन, खुपिरे सकल मराठा समाज, कसबा सांगाव सकल मराठा समाजाने आंदोलनास पाठिंबा दिला.

Web Title: Maratha reservation agitation Budhawar Peth Activists