esakal | इस्लामपुरात मराठा समितीच्या कार्यकर्त्यांकडून मुंडन; आरक्षण रद्दचा नोंदवला जाहीर निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

इस्लामपुरात मराठा समितीच्या कार्यकर्त्यांकडून मुंडन; आरक्षण रद्दचा नोंदवला जाहीर निषेध

इस्लामपुरात मराठा समितीच्या कार्यकर्त्यांकडून मुंडन; आरक्षण रद्दचा नोंदवला जाहीर निषेध

sakal_logo
By
शांताराम पाटील

इस्लामपूर : मराठा समाज (maratha reservation) आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ येथील मराठा समाज समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर मुंडन केले. सरकारच्या (State government)निषेर्धात घोषणा देऊन न्यायालयाने (suprime court) याचा फेरविचार करून समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी केली.

यावेळी उमेश कुरळपकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अत्यंत दुर्दैवी आहे. मराठा समाजाला न्यायालयाच्या निर्णयाने मोठा धक्का बसला आहे. या निकालाचा अनेक पिढ्यांवर परिणाम होणार आहे. कोर्टाने गायकवाड समितीचा अहवाल फेटाळणे दुर्दैवी आहे. मराठा आरक्षण देण्यासारखी स्थिती राज्यात नाही हे कोर्टाचे म्हणणे चुकीचे व निषेधार्थ आहे. आम्ही पुन्हा लढा उभा करु व आरक्षण मिळवू. सगळ्याच मराठा नेत्यांचा व राजकीय पक्षांचा मराठा क्रांती मोर्चा वाळवा तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो. यावेळे दिग्विजय पाटील, विजय महाडिक, सागर जाधव, सचिन पवार, अभिजीत शिंदे, विजय लाड, सागर पाटील, रामभाऊ कचरे उपस्थित होते.

हेही वाचा: रोज भाजी बनवून कंटाळला असाल तर या टिप्स झटपट करून देतील तुमचं काम