esakal | रोज भाजी बनवून कंटाळला असाल तर या टिप्स झटपट करून देतील तुमचं काम

बोलून बातमी शोधा

रोज भाजी बनवून कंटाळला असाल तर या टिप्स झटपट करून देतील तुमचं काम
रोज भाजी बनवून कंटाळला असाल तर या टिप्स झटपट करून देतील तुमचं काम
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : स्वयंपाकात घरी भाजी (Sabji) बनवणे हे रोजचे काम आहे. परंतु रोजचे हे काम कधीतरी बोअर होऊ शकते. रोज तीच भाजी तोच स्वयंपाक करून बोअर होणं स्वाभाविक आहे. परंतु रोज असं काय नवीन बनवले जाईल त्यामुळे घरचा स्वयंपाक (Lunch) उत्तम होईल आणि वेळ कमी लागेल. अशावेळी आपल्याला वाटतं की अशा काही ट्रिक्स माहित असायला हव्यात जे तुमचं काम सोप्प करून टाकतील. त्यामुळे आम्ही आज अशाच काही ट्रिक्स घेऊन आलो आहोत, ज्या तुम्हाला पसंद पडतील. या काही ट्रिक्स तुमच्या रोजच्या जेवणातील काही समस्या थोड्या दूर करण्यासाठी मदत करतील. याच्या वापराने उरलेल्या स्वयंपाकानंतर फावल्या वेळात तुम्ही आराम करू शकता. तसेच तुम्ही भाजी मसाला बनवून ठेवू शकता आणि भरवा भाजीच्या अनेक रेसिपी (Receipe) ट्राय करू शकता.

भरवा भाजीसाठी मसाला बनवण्याच्या काही सोप्या टिप्स

जर तुम्ही भरवा भाजी बनवणार असाल तर त्याचा मसाला तयार करण्यासाठी खूप वेळ लागतो. कांदा, टोमॅटो हे भाजून घेऊन त्याची प्युरी बनवावी लागते. हे थोडं मेहनतीचं काम आहे. सोबतच तुम्ही लसुन आणि आलं पेस्ट बनवणार असाल तर थोडा वेळ लागतो. यासाठी एक सोपी ट्रीक आहे. यामध्ये तुम्ही शेंगदाण्याची वाटणं घालू शकता. त्यामुळे तुमचे काम सोपे होऊ शकते. जर तुम्ही गडबडीत असाल आणि तुमच्याकडे सब्जीचा मसाला तयार नसेल किंवा तो कसा बनवतात याची काही माहिती नसेल तर तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा चुरा घालू शकता. यामुळे भाजी बनवताना याचा फ्लेवर छान राहील शिवाय त्याची चवही वाढेल.

हेही वाचा: आरक्षण रद्द हा समाजाच्या दृष्टिकोनातून अत्यंत दुर्दैवी प्रसंग : संभाजीराजे

पनीर (paneer) भाजी बनवण्यासाठी टीप

पनीरची भाजी साधारणत सर्व घरांमध्ये बनवली जाते. पनीर घरीच बनवण्याची प्रक्रिया केली जाते. परंतु जादा तर लोकांना हा प्रॉब्लेम असतो की पनीर बाजार मध्ये मिळते त्यासारखे सॉफ्ट नाही. ते हार्ड आहे. यावेळी तुम्ही छोटी टीप वापरू शकता. ती अशी पनीर तळल्यानंतर तुम्ही थोड्यावेळासाठी कोमट पाण्यामध्ये घालू शकता. तुम्ही यानंतर ग्रेव्हीमध्ये शिजवू शकता. त्यामुळे पनीरची भाजी स्वादिष्ट होते.

चणे किंवा हरभरे भिजवणे विसरला असाल तर

काही वेळा असे होते की सकाळी आपल्याला चण्याची भाजी बनवायची असते परंतु रात्री त्याला भिजत घालाणे आपण विसरतो. अशावेळी भाजी बनवली तरी खाताना ते कच्चे राहतात. परंतु तुम्ही त्यामध्ये पपईचे तुकडे घातल्यास ते शिजून जातात. तसेच या भाजीचा स्वाद उत्तम होतो. चण्याची भाजी बनवताना कच्चा पपई (जो उकळलेला असतो) तो सब्जी मध्ये घातल्यास स्वाद दुप्पट चांगला होतो.

हेही वाचा: 'सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निराशाजनक, राज्य सरकारच्या समन्वयामुळे आरक्षण रद्द'