Maratha Reservation : उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे कोल्हापुरात स्वागत

Maratha Reservation : उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे कोल्हापुरात स्वागत

कोल्हापूर - मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे कोल्हापूरकरांनी जोरदार स्वागत केले. न्यायालयाचा निर्णय जाहीर होतात मराठा समाजासह इतर समाजातील बांधव ऐतिहासिक दसरा चौकात जल्लोष केला. पण आरक्षणाच्या टक्केवारीबाबतच्या निर्णयावर बैठक घेऊन पुढील दिशा निश्चित करण्याचे जाहीर करण्यात आले.  

एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, राजर्षी शाहू महाराज की जय अशा जयघोषाने चौक दुमदुमून गेला. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कार्यकर्त्यांना हीच खरी श्रद्धांजली असल्याची भावना मराठा समाज बांधवांनी यावेळी व्यक्त केली. मात्र आरक्षणाच्या टक्केवारीबाबत बैठक घेऊन पुढील दिशा ठरवली, जाईल, असे मराठा सेवा संघाचे वसंतराव मुळीक यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com