"मराठा'चे दोन कोटींचे टी-शर्ट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 सप्टेंबर 2016

सांगली - मराठा क्रांती मोर्चात काळ्या रंगावर भगवा यल्गार पाहायला मिळणार आहे. या निःशब्द मोर्चात टी-शर्टवरील धगधगत्या भावनांचा यल्गार होणार आहे. थोडे-थोडके नव्हे तर तब्बल 2 लाखांहून अधिक टी-शर्ट या मोर्चासाठी विकले गेले आहेत. सरासरी शंभर रुपये किमतीच्या या टी-शर्टची उलाढाल तब्बल 2 कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. 

"एक मराठा लाख मराठा‘, "होय, मी मराठा‘, "मी जाणार, तुम्हीही या‘, "मराठा क्रांती मोर्चा‘ अशा शब्दज्वाळांनी सजलेले हे टी-शर्ट आहेत. त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र झळकते आहे. बंद मुठीचा बुलंद आवाज बोलतो आहे. काही टी-शर्ट हे भगव्या रंगातील आहेत. त्यावर डिजिटल छपाई करून घेण्यात आली आहे. ते खास आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. सांगली, मिरज, इस्लामपूर, विटा, तासगाव, शिराळा, जत आदी ठिकाणी टी-शर्ट विक्रीसाठी ठेवण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यालयासमोर एक हातगाड्यावर टी-शर्ट उपलब्ध करण्यात आले. तेथे तरुणाईने उत्साहाने त्याची खरेदी केली. काही नेत्यांनी शंभर, दोनशे, हजार टी-शर्ट खरेदी करून कार्यकर्त्यांना वाटले. 

योग "नऊ‘चा... 

दुचाकी, चारचाकी वाहन घेतलं की त्याच्या नोंदणी क्रमांकाची बेरीज 9 आली पाहिजे, असा आग्रह असतो. त्यात मराठा तरुण खूपच पुढे. विशेष म्हणजे, सांगलीत मराठा क्रांती मोर्चा निघतोय तो 27-9-2016 या तारखेला. 27 ची बेरीज 9 होते. महिना 9 वा आहे. शिवाय 2016 ची बेरीजही 9 इतकीच होते. या 9 नऊची बेरीज केली तरी ती 27 होते आणि त्याची बेरीज पुन्हा 9... त्यामुळे हा लकी नंबरचा योग चर्चेत आहे.

Web Title: Maratha two crore T-shirt