#MarathaKrantiMorcha आंदोलनकर्त्यानी दोन एसटीच्या काचा फोडल्या 

चंद्रकांत देवकते
रविवार, 22 जुलै 2018

मोहोळ  (सोलापूर) : सोलापूर- पंढरपूर मार्गावर टाकळी सिंकदर येथे मराठा आरक्षणात सहभागी संतप्त जमावाने दोन एसटी बसेसच्या काचा फोडल्या. पंढरपूरहुन पुळूजकडे जाणारी  (एनएच १२ इएफ ६७९७) वाहक डी एम कोल्हे, चालक डी एम  चव्हाण, तसेच मंद्रुप हुन पंढरपूरकडे जाणारी एसटी (एमएचबीटी ०४६९) वाहक सुर्यकांत उन्हाळे, चालक अर्जुन गाढवे, अशा या दोन एसटीच्या चालकांनी मोहोळ पोलिस स्टेशनमध्ये खबर दिली आहे.

वाहकाने दिलेल्या माहीतीनुसार एसटीवर संतप्त जमावाने दगडफेक केली. मोटारसायकल पाठलाग करीत एसटी थांबवून प्रवाशांना उतरवून मोडतोड केली . या दगडफेकीत चालक अर्जुन गाढवे हा किरकोळ जखमी झाला आहे. परिणामी आषाढी एकादशीला जाणाऱ्या एसटी प्रवाशावर भितीचे सावट पसरले असुन हे आंदोलन अधिक चिघळल्यास पोलिस प्रशासनावरील ताण अधिक वाढणार अशी शक्यता दिसत आहे .   

Web Title: #MarathaKrantiMorcha the agitators damage two ST