ठिय्या आंदोलनस्थळी भारुडाचा कार्यक्रम..

दत्तात्रय खंडागळे
मंगळवार, 31 जुलै 2018

संगेवाडी (सोलापुर) : सांगोला येथील सकल मराठा समाजातर्फे आठव्या दिवशीही शांततेत ठिय्या आंदोलन सुरु आहे. आज मंगळवारी तहसिल कार्यालयासमोर भारुडाचा कार्यक्रम घेऊन अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.

सांगोला तहसिल कार्यालयासमोर मंगळवार (ता. 24) तारखेपासुन सुरु झालेले ठिय्या आंदोलन आठव्या दिवशीही सुरु आहे. आतापर्यंत तालुक्यातील विविध सामाजिक व राजकीय अशा 45 संघटनांनी लेखी पत्रे दिली आहेत. सकल मराठा समाजातर्फे दररोज वेगवेगळ्या प्रकारचे शांततेत आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये हरिनामाचा गजर, भारुड असे कार्यक्रम आंदोलन स्थळी घेण्यात येतात. 

तसेच फडणवीस सरकारचे 'फसणवीस सरकार' असे नामकरण सोहळाही आंदोलनस्थळी करण्यात आले. तहसिल गेटबंद आंदोलनही केले गेले. दररोज ठराविक गावांना बोलवुन आतापर्यंत आंदोलन करण्यात येत आहे. तरुणांनी कोणत्याही प्रकारे हिंसा न करता आंदोलन करावे. आरक्षणाशिवाय ठिय्या आंदोलन बंद करण्यात येणार नाही असे सकल मराठा समाजातर्फे सांगण्यात आले.

Web Title: MarathaKrantiMorcha Bharud program in maratha agitation