आरक्षणाच्या मागणीसाठी लोणीव्यंकनाथला रक्तदान आंदोलन 

संजय आ. काटे 
मंगळवार, 31 जुलै 2018

श्रीगोंदे (नगर) : मराठा आरक्षणासाठी काही ठिकाणी हिंसात्मक आंदोलन सुरु असतानाच तालुक्यातील लोणीव्यंकनाथ येथील सकल मराठा समाजाने मात्र मराठा मुस्लिम व धनगर समाजांच्या आरक्षणासाठी थेट रक्तदान आंदोलन करीत हिंसावादी आंदोलकांना चपराक देत वेगळा आदर्श घालून दिला. मराठ्यांसह मुस्लिम व धनगर समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी व आंदोलनात जखमी झालेल्या सहकाऱ्यांसाठी आज लोणीव्यंकनाथ येथे रक्तदान आंदोल झाले.

यात शंभरावर तरुणांनी रक्तदान केले. वेगळा पायंडा व आदर्शवादी या कामात काही पोलिस कर्मचाऱ्यांही रक्तदान करीत आयोजकांचे कौतूक केले. आरक्षणाच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोणीव्यंकनाथ येथील तरुणाईने रक्तदान आंदोलन उभे करून नवा आदर्श निर्माण केला आहे. आंदोलनात सुमारे 100 जणांनी रक्तदान केले. हे रक्त जखमी आंदोलनकर्ते व अपघातग्रस्तांना देण्यात येणार आहे. आंदोलनास पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी भेट देत अशा कामाला पाठींबा दिला.

आंदोलन करणे हा जनतेचा अधिकार आहे पण अलिकडे हिंसक आंदोलने होतात ही दुर्देवी बाब आहे. लोणीव्यंकनाथ मधील तरुणांनी कुणाचा तरी जीव वाचविण्याच्या भावनेतून आंदोलन केले ही चांगली बाब असल्याचे पोवार यांनी यावेळी सांगितले. 
नगर येथील अष्टविनायक रक्तपेढी चे डॉ. दिलीप दाळे, डॉ. संदिप पाटोळे यांच्या टीमने ही प्रकिया पार पाडली. 
आंदोलनासाठी नामदेव जठार, राजेंद्र काकडे, सुहास काकडे, भास्कर कुंदाडे ,दिपक गुंड, रामदास काकडे, भरत काकडे, नामदेव काकडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: MarathaKrantiMorcha Blood donation agitation for the demand for reservation