#MarathaKrantiMorcha पंढरपुरला जाणाऱ्या गाड्या रद्द

Cancellation of ST bus going to Pandharpur
Cancellation of ST bus going to Pandharpur

करमाळा : करमाळा येथे मराठा समाजाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून सकाळी एसटी बसवर( एम.एच.14 बी.टी.3750) 
दगडफेक करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक, बीड, नगर, औरंगाबाद, जळगांव या भागातून पंढरपूरला जाणाऱ्या व पंढरपुरवरून परत या भागात जाणाऱ्या सर्व एसटी गाड्या करमाळा येथे थांबवण्यात आल्याने वारकरी करमाळा येथेच अडकून पडले आहेत. दगडफेक करण्यात आलेली गाडी अहमदनगर हुन पंढरपुराला जात होती. तर करमाळा आगाराच्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

काल शनिवारी पासुन करमाळा येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. राञभर आंदोलक तहसील कार्यालयाच्या समोरच बसुन होते. 
सध्या करमाळा बसस्थानकात प्रवाशी व वारकरी यांची मोठी गर्दी झाली आहे. 

गेली पंधरा वर्षात कधीही अशी गैरसोय झाली नाही. पंढरपुराला 14 तास रांगेत उभे राहुन विठ्ठलाचे दर्शन घेऊन परत जात असताना आमची गाडी करमाळ्यात थांबवुन ठेवली आहे. घरी जात असताना अडकलो आहे. येथे चहा-पाणीही मिळेना झाले आहे. मराठा व इतर समाजाच्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या पाहीजे. त्यासाठी पांडुरूंगाने फडणवीस साहेबांना सदबुद्धी द्यावी हीच प्रार्थना.

- अप्पा सापते, रैळस, ता.निफाड, नाशिक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com