#MarathaKrantiMorcha चंद्रभागेत अर्धजलसमाधी आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

आरक्षण मागणीसाठी आक्रमक झालेल्या सकाल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आज (मंगळवार) येथील चंद्रभागेच्या पात्रामध्ये अर्ध जलसमाधी आंदोलन केले. या वेळी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या सामाज बांधवांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. 

पंढरपूर : आरक्षण मागणीसाठी आक्रमक झालेल्या सकाल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आज (मंगळवार) येथील चंद्रभागेच्या पात्रामध्ये अर्ध जलसमाधी आंदोलन केले. या वेळी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या सामाज बांधवांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. 

येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन पंढरपूर शहरातील व ग्रामीण भागातून आलेल्या सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शहरातून मोटारसायकल रॅली काढली. त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी येथील चंद्रभागानदी पात्रात जावून पाण्यात अर्ध जलसमाधी आंदोलन केले.

यावेळी कार्यकर्त्यांनी नदीपात्रातील खोलपाण्यात धाव घेतली असता, आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी त्यांना खोल पाण्यातून बाहेर काढले. आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. शिवाय पोलिस मित्र आणि जीवरक्षक उपस्थित होते. येथील, तहसील कार्यालयासमोर सुरु असलेले ठिय्या आंदोलन आज सहाव्या दिवशीही सुरु होते. येथील आंदोलनामध्ये अनेक गावातील लोक सहभागी झाले होते. आंदोलना दरम्यान आजही भजन करुन शासनाचा निषेध केला.

Web Title: MarathaKrantiMorcha chandraBhaga Movement