#MarathaKrantiMorcha एक मराठा.. लाख मराठाच्या घोषणेने नेवासे दणाणले

सुनील गर्जे 
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

नेवासे - मराठा समाजाला आरक्षण मिळावे मागणीसाठी व हुतात्म्यास श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज शुक्रवार (ता. 3) रोजी साडेआकरा वाजता नेवासे तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर मराठा धडक मोर्चाचा प्रारंभ इस्तेमा मैदान येथून झाला. मोर्चात हजारो सकल मराठा, धनगर व मुस्लीम समाजासह हजारो महिला व नागरीक सहभागी झाले आहेत. 

या धडक मोर्चात मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह, शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी द्यावी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास 10 लाख रुपयांची मदत देऊन या कुटुंबातील एका सदस्यास शासकीय नोकरीत सामावून घ्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अमलबजावणी करा, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी पाच हजार कोटी रुपयांची तरतूद करावी, छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी निधी देऊन त्वरित काम सुरू करावे, छत्रपतींची जयंती 29 फेब्रुवारी या एकाच दिवशी साजरी करावी, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बलिदान देणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत द्या, मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलनकर्त्यांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावेत, या मागण्या मांडणात आल्या आहे. काही वेळातच हा धडक मोर्चा नेवासे तहसील कार्यालयावर धडकणार आहे. 

या धडक मोर्चात नेवासे तालुक्यातील सर्वधर्मीय महिला व नागरिकांसह सकल मराठा मोर्चाचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. 

मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे सात पोलिस अधिकारी व 120 पोलिसांचा ताफा नेवाश्यात तैनात करण्यात आला आहे. 

Web Title: MarathaKrantiMorcha responce to maratha kranti morcha in newasa