#MarathaKrantiMorcha इंदापूरच्या पश्‍चिम भागामध्ये कडकडीत बंद

राजकुमार थोरात
बुधवार, 25 जुलै 2018

वालचंदनगर - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आज बुधवार  इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील वालचंदनगर, जंक्शन, लासुर्णेमध्ये शांततेमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.  वालचंदनगर ग्रामपंचायतीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. लासुर्णेमध्ये आठवडे बाजारही बंद ठेवण्यात आला होता.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अमंलबजावणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनामध्ये इंदापूर तालुक्यातील अनेक गावांनी सहभाग घेतला. तालुक्याच्या पश्‍चिम भागातील वालचंदनगर, जंक्शन व लासुर्णे या मुख्य गावामध्ये व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी कडकडीत बंद शांततेमध्ये पाळला. वालचंदनगर ग्रामपंचायतीची मासिक मिटींग सरपंच छाया मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये ग्रामपंचायत सदस्य हर्षवर्धन गायकवाड यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे असा ठराव मांडला. याला सदस्य अंबादास शेळके यांनी अनुमोदन देवून ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आज बुधवार रोजी लासुर्णेमधील आठवडे बाजार सकाळी बंद ठेवण्यात आला होता. वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक अरविंद काटे यांनी गावोगावी भेटी दिल्या.

Web Title: #MarathaKrantiMorcha response to Maharashtra band in indapur