#MarathaKrantiMorcha लोणंद बंद' ला उत्स्फुर्तपणे प्रतिसाद

रमेश धायगुडे
बुधवार, 25 जुलै 2018

लोणंद : मराठा क्रांती मोर्चा व लोणंद मराठा समाज मंडळाने संयुक्तीक आरक्षण व विविध मागण्यासाठी आज (ता. २५) पुकारलेल्या 'लोणंद बंद' ला सर्व स्तरातून उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळाला.

लोणंद : मराठा क्रांती मोर्चा व लोणंद मराठा समाज मंडळाने संयुक्तीक आरक्षण व विविध मागण्यासाठी आज (ता. २५) पुकारलेल्या 'लोणंद बंद' ला सर्व स्तरातून उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळाला.

बेंदराचा सण असतानाही आज सकाळ पासूनच शहरातीत सर्व दुकाने बंद ठेवून शंभर टक्के कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी शहरातून राज्य शासणाच्या विरोधात विविध घोषणा देत निषेध मोर्चा काढून शिरवळ चौक येथे पाऊण तास रास्ता रोखो करण्यात आला.
यावेळी शहरातीत विविध सामाजीक संस्था, संघटना, विविध राजकीय पक्ष यांनी या मोर्चास पाठींबा व्यक्त केला. त्यावेळी लोणंद पोलिस, खंडाळा तहसिलदार, लोणंद  नगरपंचायत आदी अधिकाऱ्यांना मोर्चाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी मराठा समाज व सर्व स्तरातील नागरीक  मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
 
Web Title: #MarathaKrantiMorcha spontaneous responce to lonad bandh