शिवसेनेसाठी मराठा कार्ड हा हुकमी एक्का

शिवसेनेसाठी मराठा कार्ड हा हुकमी एक्का
शिवसेनेसाठी मराठा कार्ड हा हुकमी एक्का

चंदगड - जिल्हा परिषदेवर भगवा फडकवणे हे ध्येय साध्य करण्यासाठी शिवसेना साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर करणार आहे. परंतु त्याहीपेक्षा मराठा कार्ड हा आमचा हुकमी एक्का आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केले.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पक्षाच्या प्रचाराचा प्रारंभ शुक्रवारी रात्री बुझवडे (ता. चंदगड) येथून करण्यात आला या वेळी ते बोलत होते. बाळासाहेब कुपेकर, संग्रामसिंह कुपेकर, तालुका अध्यक्ष अशोक मनवाडकर, राजू रेडेकर प्रमुख उपस्थित होते.

श्री. देवणे म्हणाले, ""चंदगडचे राजकारण गटातटात विभागले आहे. ते भेदण्यासाठी शिवसेना सर्वतोपरी प्रयत्न करेल.'' जिल्हा परिषदेसाठी चंदगडमधून अनिल दळवी, तुर्केवाडीतून भरमाण्णा गावडे व नेसरीतून संग्रामसिंह कुपेकर यांच्या उमेदवारीची घोषणा त्यांनी केली. उमेदवार अनिल दळवी म्हणाले, ""सामाजिक कार्य हा माझा पिंड आहे. राजकीय सत्ता मिळाल्यास अधिक गती मिळेल, या हेतूने या निवडणुकीत उतरलो आहे.'' संग्रामसिंह कुपेकर, बाळासाहेब कुपेकर यांचीही भाषणे झाली. आप्पाजी कांबळे, गोपाळ गावडे, संग्रामसिंह अडकूरकर, शारदा घोरपडे, उदय मंडलिक, धोंडिबा दळवी, डॉ. अनिल पाटील, प्रमोद कांबळे, सचिन सातवणेकर, राजू देसाई, पवन सावंत, चंद्रकांत किरमटे, अशोक देसाई, फिरोज मुल्ला यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. शाखाप्रमुख चंद्रकांत बांदेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश ढेगसकर यांनी आभार मानले. शिवाजी धामणेकर यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com