अक्कलकोट बंद शंभर टक्के यशस्वी; शांततेत निषेध मोर्चा काढत दिले निवेदन

राजशेखर चौधरी
बुधवार, 3 जानेवारी 2018

अक्कलकोट - कोरेगाव भीमा येथे द्विशताब्दीच्या समारोहाच्या निमित्ताने सोमवारी विजयस्तंभस्थळी अभिवादनाचा मोठा कार्यक्रम होत असतानाच कोरेगाव भीमा परीसरात अनुचित घटना घडली होती. त्याचा निषेध म्हणून आज अक्कलकोट तालुका मागासवर्गीय संघर्ष समितीच्या वतीने अक्कलकोट बंद ठेवण्यात आला होता.

अक्कलकोट - कोरेगाव भीमा येथे द्विशताब्दीच्या समारोहाच्या निमित्ताने सोमवारी विजयस्तंभस्थळी अभिवादनाचा मोठा कार्यक्रम होत असतानाच कोरेगाव भीमा परीसरात अनुचित घटना घडली होती. त्याचा निषेध म्हणून आज अक्कलकोट तालुका मागासवर्गीय संघर्ष समितीच्या वतीने अक्कलकोट बंद ठेवण्यात आला होता.

सदर बंद शंभर टक्के यशस्वी झाला आणि निषेध म्हणून शांततेत मुख्य रस्त्यावर मोर्चा काढून पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांना निवेदन देण्यात आले. आज झालेल्या बंदमध्ये शहरातील किराणा, सराफ व कापड व्यापारी संघटना, हॉटेल व इतर सर्व व्यावसायिक, शाळा व महाविद्यालये यांनी संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत सहभाग नोंदविला. अक्कलकोट प्रमाणेच दुधनी, मैंदर्गी, वागदरी आणि तडवळ या ठिकाणीही संघर्ष समितीने बंदचे आवाहन केले होते आणि सर्वांनी घडलेल्या घटनेच्या निषेध व्यक्त करीत आपला रोष व्यक्त केला. अक्कलकोट दक्षिण व उत्तर पोलिस ठाण्याच्या प्रशासनाने व्यवस्थित बंदोबस्त ठेऊन परिस्थिती व्यवस्थित हाताळली. यावेळी बोलताना कृती समितीच्या नेत्यांनी या हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार मनोहर भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच या घटनेची दखल आंतरराष्ट्रीय मानवाधिकार यंत्रणेने घ्यावी. अक्कलकोटला झालेल्या आजच्या बंदमध्ये अविनाश मडिखांबे, चंद्रशेखर मडिखांबे, शिलामणि बनसोडे, उत्तम गायकवाड राहुल रूही, तुकाराम दुपारगुडे, निजप्पा गायकवाड, संदीप मडिखांबे, किरण किरात, बंडू मडिखांबे संदीप बाळशंकर, सचिन गजधने, अमर शिरसाट, विकी बाबा चौधरी, तम्मा सुतार, दत्ता मडिखांबे, प्रभाकर गायकवाड, अजय मुकणार, दिनेश रूही, सूरज सोनके, अप्पू सोनके, सतीश आवसे, सुधीर सोनकवडे, नितिन शिवशरण, कोंडीबा सोनकांबळे, पपु मडिखांबे, चंद्रकांत इंगळे, राम जाधव, अप्पा भालेराव, महेश गायकवाड, स्वप्निल गायकवाड, अप्पू गायकवाड स्वामीराव गायकवाड स्वामी गायकवाड, साई गायकवाड, सुनील खवळे, निजप्पा गायकवाड, अंबादास गायकवाड, गौतम मडिखांबे, दिपक बनसोडे चंद्रकांत गायकवाड रोमित मडिखांबे, महादेव बनसोडे, दिपक मडिखांबे, विनोद मडिखांबे, रविराज पोटे, रविराज गायकवाड, नागेश मडिखांबे, शुभम मडिखांबे, कुमार घाटगे, दशरथ मडिखांबे, अविराज गायकवाड, सागर घटकांबळे, सागर सिरसाट आदींसह मोठ्या संख्येने भिमसैनिक उपस्थित होते.

Web Title: Marathi news Akkalkot Koregaon Bhima rite