बार्शीहून तुळजापूरला जाणारी बस पलटी, बारा जखमी

सुदर्शन हांडे
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

बार्शी : बार्शी-तुळजापूर रस्त्यावर गौडगाव नजीक नागोबा मंदिरा लागत वळणावर चालकांचे बस वरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली. यात बस चालक-वाहक व दहा प्रवासी असे एकूण बारा जण जखमी झाले आहेत. 

बार्शी आगारातून सकाळी साडे सहा वाजता तुळजापूरला (क्रमांक MH14 BT 2644) ही बस निघाली होती, उपळे (दु) गावाच्या पुढे गेल्यानंतर गौडगाव जवळ नागोबा मंदिरा जवळ तीव्र वाळणाला चालकांचे बस वरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या खाली जात पलटी झाली. हा अपघात इतका भीषण आहे ही पूर्ण बस चक्काचूर झाली आहे. 

बस अपघातातील जखमींची नवे पुढील प्रमाणे : 
राजेंद्र हरी साखरे (वाहक) - 37 वर्ष, फिरोज जव्हार मुलाणी (चालक) - वय 36, रूक्मीणी रामा हिवरे - वय 55, रामा कोंडीबा हिरवे - वय 66, तानाजी हनूमंत आगरकर - वय 39, बाबु गणपत धोत्रे -वय 60, उज्वला सुरेश मारकळ - वय 30, सुमन काशीनाथ मोरे - वय 45, भिमराव सिताराम जाधव - वय 65, बळीराम महादेव माळी - वय 40, वैष्णव प्रदीप भड - वय 13, नितीन बाळू सुतकर - वय 19. 

Web Title: Marathi news barshi news bus accident

टॅग्स