पशुपक्ष्यांना चारा आणि पाणवठेही!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

लोणंद - वाढत्या कडक उन्हाचे चटके, निष्पर्ण झालेली झाडेझुडपे, दुर्मिळ होत असलेले पाणीसाठे आदींमुळे मुक्‍या पशुपक्ष्यांना जीव वाचवण्यासाठी कसरत करावी लागते. त्याची जाणीव ठेवत रंगपंचमी उत्सवात वाया जाणाऱ्या लाखो लिटर पाण्याचा या पशुपक्ष्यांना व सुकलेल्या झाडांना उपयोग व्हावा, यासाठी येथील साथ प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी लोणंद शहर व परिसरात विविध ठिकाणच्या झाडांवर व जमिनीवर पशुपक्ष्यांसाठी चारा व पाणवठे उभारले.

पूर्वी विविध प्रकारचे पक्षी आपल्या आजूबाजूला सहजपणे पाहायाला मिळायचे. पक्ष्यांच्या किलबिलीने प्रसन्न वाटायचे. मात्र, परिस्थिती उलट होऊन बसली आहे. ग्रामीण भागात विहिरी, झाडे, अडगळीच्या खोल्या आदींमध्ये सुगरणीने विणकाम केलेली घरटी आढळून येतात. मात्र, ही विणकाम केलेली घरटी पक्ष्यांविना रिकामी आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या जागतिक चिमणी दिनाला अनेक सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यालये  आदींनी भरभरून प्रतिसाद देतात. यामध्ये पक्ष्यांना धान्य- पाणी देऊन हा दिन साजरा करण्यात येतो. मात्र, एका दिवसाने दुर्मिळ झालेली चिमणी पुन्हा दिसणार नाही, हेही तेवढेच खरे आहे. त्यासाठी समाजजागृती होऊन प्रत्येकानेच पुढाकार घेणे गरजेचे आहे. उन्हाच्या चटक्‍याने सध्या वन्यजीव, पशुपक्ष्यांची भटकंती सुरू आहे. पाण्यासाठी आर्त हाक मारणाऱ्या मुक्‍या जिवांना आता पाणवठे, थोडे धान्य देण्याची गरज आहे. सर्व सामाजिक संघटनांनी अशा पशुपक्ष्यांसाठी उपक्रम हाती घेणे गरजेचे आहे.

पुस्तकातील निर्जीव चिमणी, काऊला प्रत्यक्षात पाहण्यासाठी चिमुरड्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. निसर्गातील या जिवांना चारा व पाणी देऊन जगवण्याची जबाबदारी आपली आहे, या भावनेतून साथ प्रतिष्ठानतर्फे हा उपक्रम राबवला जात आहे. 
- कय्युम मुल्ला,  साथ प्रतिष्ठान

Web Title: marathi news bird water summer satara