मंगळवेढ्यात स्वच्छतेचा जागर; पाच हजार डस्टबीनचे वाटप

हुकूम मुलाणी
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

मंगळवेढा - सर्वेक्षण 2018 अंतर्गत स्वच्छ सुंदर मंगळवेढा करण्यासाठी नगरपालिकेच्या शहरात पाच हजार डस्टबीनचे वाटप करण्यात आले आहे. नगराध्यक्षासह सर्व लोकप्रतिनिधींनी स्वच्छतेचा जागर सुरु केला आहे. यामुळे शासनाच्या गुणांकनामध्ये नगरपालिका राज्यात पहिल्या दहा क्रमांकामध्ये आली आहे. शहरात असलेल्या सर्वच प्रभागातील नगरसेवकांनी यासाठी प्रत्येक घराला भेटी दिल्या असून स्वच्छतादूतांना 1600 टी शर्टचे वाटप करण्यात आले. 

शहर स्वच्छ ठेवल्याने उत्तम आरोग्य मिळते प्रभागातील प्रत्येक घरात ओला कचरा ठेवण्यासाठी हिरव्या कलरची डस्टबीन तर वाळलेल्या कार्यासाठी निळ्या कलरची डस्टबीनचे वाटप करण्यात आले याशिवाय घरात जमा होणारा कचरा इतरत्र न टाकता या या डस्टबीनमध्येच टाका व प्लॅस्टिकचा वापर करु नका परीसर स्वच्छ ठेवण्याबाबाबत प्रबोधन करण्यात आले. प्लॅस्टिकमुक्तीसाठी प्रत्येक नगरसेवकांच्या पुढाकारांच्या पिशव्याचेही वाटप करण्यात आले स्वच्छतेच्या साहित्याचे वाटप नगराध्यक्ष अरुणा माळी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, पक्षनेते अजित जगताप, अनिता नागणे, भागीरथी नागणे, प्रविण खवतोडे, सुमन शिंदे, पांडूरंग नाईकवाडी, सब्जपरी मकानदार राजश्री टाकणे, संकेत खटके, पारुबाई जाधव, रामचंद्र कौडूभैरी, अनिल बोदाडे, रतन पडवळे, निर्मला माने, प्रशांत यादव, लक्ष्मी म्हेत्रे, बशीर बागवान, राहूल सावंजी या लोकप्रतिनिधीसह मुख्याधिकारी डॉ. निलेश देशमुख आणि त्यांचे कर्मचारी यांनी पुढाकार घेतला असून सध्या शहर स्वच्छतेसाठी चौकाचौकात माहिती दर्शक फलक लावण्यात आले.  सध्या शहरात स्वच्छतेबाबत सुरु केलेल्या अ‍ॅपमध्ये जनतेच्या तक्रारी येताच, त्याची तात्काळ दखल घेतली आहे. पालिकेला शहरात विकास कामासाठी, स्वच्छतेच्या कामासाठी किमान पाच कोटी रुपये मिळणार असल्याचे निश्रि्चत आहे. शहराच्या स्वच्छतेच्या नियोजनाच्या फेरीत मोठे यश मिळाले. 

Web Title: marathi news clean city five thousand dustbin distribute