मधुमेहपीडीत शालेय विद्यार्थिनीसाठी आले मदतीचे हात

रामदास वाडेकर
शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017

टाकवे बुद्रुक : आंदर मावळातील पिंपरी येथील पौर्णिमा प्रकाश कांबळे ही विद्यार्थिनी मधुमेह पिडीत आहे, ती माळेगावतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकत आहे, या विद्यार्थ्यांनाच्या औषधोपचारासाठी मदतीची गरज असल्याची बातमी सकाळने शुक्रवार (ता. २४)ला मधुमेह पिडीत विद्यार्थी उपचारांच्या मदतीच्या प्रतिक्षेत हे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत या विद्यार्थ्यांच्या मदतीला अनेकांनी हात पुढे केला. पुण्यातील रास्ता पेठेतील मधुमेहतज्ञ डॉ. अभय मुथा यांनी तिला संपूर्ण उपचार करण्याचे स्पष्ट केले आहे. अजमेरा कॉलनीतील शितल खांडेकर यांनी औषधांचा खर्च उचला आहे. तर, कामशेत येथील डॉ.

टाकवे बुद्रुक : आंदर मावळातील पिंपरी येथील पौर्णिमा प्रकाश कांबळे ही विद्यार्थिनी मधुमेह पिडीत आहे, ती माळेगावतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकत आहे, या विद्यार्थ्यांनाच्या औषधोपचारासाठी मदतीची गरज असल्याची बातमी सकाळने शुक्रवार (ता. २४)ला मधुमेह पिडीत विद्यार्थी उपचारांच्या मदतीच्या प्रतिक्षेत हे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत या विद्यार्थ्यांच्या मदतीला अनेकांनी हात पुढे केला. पुण्यातील रास्ता पेठेतील मधुमेहतज्ञ डॉ. अभय मुथा यांनी तिला संपूर्ण उपचार करण्याचे स्पष्ट केले आहे. अजमेरा कॉलनीतील शितल खांडेकर यांनी औषधांचा खर्च उचला आहे. तर, कामशेत येथील डॉ. सचिन नागोत्रा यांनी तपासणीची तयारी दर्शविली आहे.

टाकवे बुद्रुक येथील भवरलाल जैन व मनोज जैन या पितापुत्रांनी पौर्णिमेच्या शाळेत जाऊन तिला रक्तातील शर्करा तपासणीचे मशीन दिले. तिचे वडील प्रकाश कांबळे व गुरूजनांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या, या यावेळी माजी सभापती शंकर सुपे, सचिन नागोत्रा, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजेश गायकवाड, संतोष पवार, सकाळचे बातमीदार रामदास वाडेकर आदी उपस्थितीत होते. 

कांबळे यांच्या पौर्णिमा या लेकीला सहा वर्षांपूर्वी या आजाराने त्रस्त केले. शेती व शेतमजूरीवर त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांची माधुरी ही सात वर्षांची असताना मधुमेहाने मृत पावली. लेकीच्या उपचारासाठी त्यांचा जीव रात्रंदिवस तळमळत आहे. पुण्यातील ससून व पिंपरीतील डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये त्यांनी उपचार सुरू केले पण, आर्थिक विवंचनेमुळे त्यांना इतक्या दूर जाणे शक्य नव्हते.

सध्या तिच्यावर उपचार येथील खाजगी दवाखान्यात सुरू आहेत. तिच्या मदतीला इतक्या सर्वांनी केलेली मदत तिला जगण्याचे बळ वाढवेल अशी अपेक्षा माजी सभापती सुपे यांनी व्यक्त केली. डॉ. अभय मुथा म्हणाले, "या मुलींचे अठरा वर्षापर्यंत पालकत्व डायबेटिस केअर अॅण्ड रिसर्च सेंटर या संस्थेमार्फत आम्ही घेत आहोत, तसेच आरोग्यासमवेत शैक्षणिक जबाबदारीही घेऊ. डॉ. सचिन नागोत्रा म्हणाले, "लाखात असा एखादा रूग्ण असतो, त्यांची वेगवेगळी लक्षणे आढळून येतात, पथ्य पाळून योग्य औषधांची गरज आहे, त्याला व्यायायामाची जोड द्यावी. मधुकर गंभीरे यांनी प्रास्ताविक केले. राहूल गुळदे यांनी सूत्रसंचालन केले. बळीराम वाघमारे यांनी आभार मानले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news diabetic girl helped by many other peoples