बनावट विवाह लावून ज्येष्ठ नागरीकाची फसवणूक

सचिन शिंदे
मंगळवार, 16 जानेवारी 2018

कऱ्हाड - वधुवर सुचक मंडळ असल्याचे भासवून एका ज्येष्ठ नागरीकाचा बनावट विवाह लावून व त्यांना सुमारे तीन ते चार लाखाला लुबाडल्याचा प्रकार येथे उघडकीस आला आहे. त्याबाबत पोलिसात दोन महिलांसह पाच जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संपतराव गणपतराव मोहिते (वय ७०, रा. बेलवडे) असे फसवणुक झालेल्या ज्येष्ठ व्यक्तीचे नाव आहे. 21 जून 2017 रोजी त्यांची प्रकार घडला होता. त्या संबंधित व्यक्तींकडून मोहिते यांना दोन वेळा मारहाण झाली आहे. त्या संबंधितांकडून मोहिते यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांनी आज फसवणुक झाल्याची फिर्याद पोलिसात दिली.

कऱ्हाड - वधुवर सुचक मंडळ असल्याचे भासवून एका ज्येष्ठ नागरीकाचा बनावट विवाह लावून व त्यांना सुमारे तीन ते चार लाखाला लुबाडल्याचा प्रकार येथे उघडकीस आला आहे. त्याबाबत पोलिसात दोन महिलांसह पाच जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संपतराव गणपतराव मोहिते (वय ७०, रा. बेलवडे) असे फसवणुक झालेल्या ज्येष्ठ व्यक्तीचे नाव आहे. 21 जून 2017 रोजी त्यांची प्रकार घडला होता. त्या संबंधित व्यक्तींकडून मोहिते यांना दोन वेळा मारहाण झाली आहे. त्या संबंधितांकडून मोहिते यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांनी आज फसवणुक झाल्याची फिर्याद पोलिसात दिली. फौजी संभाजी पवार-कोळी उर्फ चुनावाला, सदाभाऊ उर्फ सर्जेराव लोहार, अशोक लोहार (तिघे रा. कासारशिरंबे), वैशाली व पवार यांची पत्नी वंदना बापू पाटील (रा. इचलकरंजी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संपतराव मोहिते यांचे बेलवडे हवेली हे मुळगाव आहे. त्यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. मुलासमवेत त्यांचा वाद आहे. त्यामुळे ते कासेगाव येथे भाड्याने खोली घेवून राहतात. 21 जूनला ते बेलवडे हवेली येथून कासेगावला जाण्यासाठी तेथील बस स्टॉपवर उभे राहिले होते. त्यावेळी त्यांच्याजवळ संभाजी पवार-कोळी आले. त्यांनी पवार यांना तुमचा पुन्हा विवाह लावून देतो. मला दिड लाख रूपये द्या, असे सांगितले. आजच्या आजच मुलगी बघायला जायचे व लग्न करुन यायचे, असे त्यांनी सांगून त्यांनी दुचाकीवरून सर्जेराव लोहार यांच्याकडे नेले. तेथून पवार, संभाजीराव व अशोक लोहार तेथून चारचाकीने इचलकरंजी येथे गेले. तेथे वंदना नावाची मुलगी त्यांना दाखवण्यात आली. त्यांना मुलगी पसंत आली. त्यानंतर लगेच विवाह निश्चित झाला. तोपर्यंत विवाह ठरवल्याबद्दल वीस हजार व प्रवासाचे पाच हजार संभाजीराव यांनी घेतले होते. लग्न ठरवताना पवार यांच्याकडून संबंधितांनी सोन्याचे दागिने व मुलीचे कपडेही घेतले. लग्न लागल्यानंतर त्यांची बॅग संबधितांनी चोरली. त्यात पावणे तीन लाख रुपये होते. ते त्या सगळ्यांनी वाटून घेतले. लग्नानंतर दुसऱ्या दिवशी वंदना व संपतराव पवार कऱ्हाडला आले. तेथे बँकेतून तेरा हजार रुपये काढले. त्यानंतर ते कोल्हापूर येथे संभाजीनगरला गेले. तेथून वंदना आई-वडीलांकडे गेली. ती पुन्हा परत आली. त्यावेळी तीच्या अंगावर दागिने नव्हेत. पवार यांनी विचारले त्यावेळी माझ्या आईवडीलांनी दागिने काढून घेतले असून मला मारुन घरातून हाकलून दिले आहे. मी आता कोठे जावू म्हणून ती रडली. तेथून ती आई-वडीलांकडे निघून गेली. ती परत आलीच नाही. संबंधित लोकांनी मिळून फसवल्याची शंका आली. मात्र त्याबाबत विचारण्यास गेले त्यावेळी त्यांनाही दोन वेळा मारहाण करण्यात आली. त्यांच्यापासून जीवास धोका निर्माण झाल्याने संपतराव पवार यांनी आज सायंकाळी तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वरील लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title: marathi news fraud senior citizen

टॅग्स