सुपनेजवळील अपघातात ट्रक अंगावरुन गेल्याने महिला ठार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

रस्त्यावरुन पाठीमागून आलेला ट्रक रस्त्यावर पडलेल्या महिलेच्या अंगावरुन गेल्याने त्या ठार झाल्या. तर पतीच्या डोक्याला रस्त्यावर पडून मार लागल्याने ते जखमी झाले.

कऱ्हाड : आडुळ (ता. पाटण) येथील यात्रेवरुन काल रात्री साडेअकराच्या सुमारास कऱ्हाडला येत असताना कऱ्हाड-पाटण रस्त्यावरील सुपने (ता.कऱ्हाड) गावाजवळील रस्त्यावर करण्यात आलेल्या गतिरोधकामुळे दुचाकीच्या झालेल्या अपघातात पती-पत्नी रस्त्यावर पडले. यात महिलेचा मृत्यू झाला.

रस्त्यावरुन पाठीमागून आलेला ट्रक रस्त्यावर पडलेल्या महिलेच्या अंगावरुन गेल्याने त्या ठार झाल्या. तर पतीच्या डोक्याला रस्त्यावर पडून मार लागल्याने ते जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संगिता चंद्रकांत भोसले असे ठार झालेल्या महिलेचे नाव असून, चंद्रकांत भोसले (रा. तांबवे) असे जखमी पतीचे नाव आहे.

याप्रकरणी पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची काम सुरु असल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अशोक भापकर यांनी दिली.  

Web Title: Marathi News Karad News Accident One Women died