6500 चौरस फूटांच्या रिबनची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

पश्चिम महाराष्ट्रात कॅन्सर जागृतीसाठी अशाप्रकारे अभिनव पद्धतीने झालेल्या या उपक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’ त्याची नोंद घेण्यात आली आहे. मुंबई येथील ‘झुवियस लाईफ सायन्सेस’च्या सहकार्याने ‘पिंक स्ट्रीट’ या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. 

कऱ्हाड : येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून विद्यापीठाच्या प्रांगणात 6500 चौरस फूट लांबीची भव्य रिबन साकारली. रिबनवर कृष्णा अभिमत विद्यापीठातील हजारो विद्यार्थ्यांसह डॉक्टर्स, प्राध्यापक आणि कर्मचार्‍यांनी गुलाबी रंगात भिजवलेल्या आपल्या हातांचे ठसे उमटवून अनोख्या पद्धतीने कॅन्सरबाबत जनजागृतीचा संदेश दिला. 

पश्चिम महाराष्ट्रात कॅन्सर जागृतीसाठी अशाप्रकारे अभिनव पद्धतीने झालेल्या या उपक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’ त्याची नोंद घेण्यात आली आहे. मुंबई येथील ‘झुवियस लाईफ सायन्सेस’च्या सहकार्याने ‘पिंक स्ट्रीट’ या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. 

डॉ. भोसले यांच्यासह विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. नीलिमा मलिक, कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका उत्तरा भोसले, कृष्णा फौंडेशनच्या संचालिका गौरवी भोसले, विनायक भोसले, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, कृष्णा रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, मेडिकल अ‍ॅडमिनिस्ट्रेटर आर. जी. नानिवडेकर, कर्करोग विभागप्रमुख डॉ. आनंद गुडूर, निमीष ठक्कर आदी मान्यवरांनी स्वत: या रिबनवर गुलाबी हातांचे ठसे उमटवून या उपक्रमाचे उद्घाटन केले. त्यानंतर हजारो विद्यार्थ्यांनी गुलाबी रंगात भिजवलेल्या आपल्या हातांचे ठसे उमटवून या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
 
Web Title: Marathi News Karad News World Cancer Day 6500 sqmtr rebean