खंडणीसाठी व्यापारी महिलेवर चाकूहल्ला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 डिसेंबर 2017

कऱ्हाड : खंडणीसाठी व्यापारी महिलेवर येथे एकाने चाकू हल्ला केला. विशाल रविंद्र वारे (रा. बुधवार पेठ) असे संबंधिताचे नाव आहे. येथील बुधवार पेठेतील कापड दुकानात ही घटना घडली. संबंधिताने काऊंन्टरवरील काचा फोडल्या. स्वतःवर ब्लेडने वार करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. साजीदा नफीसा खान (रा. कऱ्हाड) असे जखमी महिलेचे नाव आहे. तीने दिलेल्या तक्रारीवरून संबंधितास पोलिसांनी अटक केली आहे. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून त्या घटनेचा निषेध केला. 

साजीदा खान त्यांच्या दुकनात काल (शुक्रवारी) एकट्याच होत्या. त्यावेळी वारे तेथे गेला. त्याने एक हजरांची खंडणी मागितली. ती देण्यास साजीदा यांनी नकार दिला. त्यावेळी वारे याने तेथे दंगा सुरू केला. त्याने ब्लेडने स्वतःवर वार केले. तो प्रकार पाहून साजीदा यांनी आरडाओरडा करून लोकांना व शेजारील व्यापाऱ्यांना बोलावले. तोपर्यंत वारे याने त्यांच्या काऊंन्टरवरील काच फोडली. त्या फुटलेल्या काचाने त्याने साजीदा यांच्यावर वार केला. त्यांच्या हातावर वार झाला आहे. दुकानात सुरू असलेली गडबड पाहून शेजारचे दुकानदार त्यांच्या दुकानात धावत गेले. त्यांना त्वरीत त्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी पोचले. त्यांनी वारेस अटक केली आहे. त्याच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल आहे.

Web Title: Marathi news karhad attack on ladies shop owner