कऱ्हाड- परिवहन कार्यालयातून आठ पावती पुस्तक गायब

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

कऱ्हाड - येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून आठ पावती पुस्तक गायब झाले आहेत. त्याबाबत पोलिस ठाण्यात चौकशी सुरू होती. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजीत शिंदे व वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रमोद जाधव यांच्यात बराचवेळ त्याबाबत चर्चा सुरू होती. गायब झालेल्या पावती पुस्तकात सुमारे पन्नास लोकांचे पैसे स्विकारून त्यांना पोच दिल्या गेल्या आहेत. पावती सापडली त्यावेळी ती गोष्ट उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शिंदे यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे. 

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सुमारे वर्षापूर्वीची आठ पुस्तक गायब आहेत. ती गोष्ट लक्षात आल्यानंतर त्याबाबत श्री. शिंदे यांनी चौकशी केली. त्यावेळी आठ पुस्तकातील सुमारे पन्नासहून अधिक पावत्या झाल्या आहेत. हेही त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याबाबत कार्यालयात सखोल चौकशी केली. त्यात काही संशयीतांची नावे आढळून आली. चोरीला गेलेल्या पुस्तकातील पावत्या दिल्या आहेत. मात्र त्याचे पैसे शासनाकडे जमा नाहीत. असेही स्पष्ट झाले. त्याचीही त्यांनी चौकशी केली. त्यानुसार त्यांनी काही संशयीतांकडून माहितीही घेतली. त्यावेळी तो प्रकार उघड झाला आहे. त्याबाबत श्री. शिंदे, निलकंठ पाटील पोलिस ठाण्यात आले. त्यांनी त्याबाबत पोलिस निरिक्षक जाधव यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती. 

त्याबाबत पोलिस निरिक्षक जाधव म्हणाले पावती पुस्तक गायब आहेत. त्याबाबत तक्रार घेण्याचे काम सुरू आहे. मागील वर्षाची आठ पावती पुस्तक गहाळ आहेत ती गोष्ट लक्षात येताच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शिंदे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार चौकशी करून गुन्हा दाखल केला जाईल.

Web Title: marathi news karhad rto news

टॅग्स