कऱ्हाडमधील महिला सुरक्षा समितीचे तीनतेरा

सचिन शिंदे 
शुक्रवार, 16 मार्च 2018

जिल्ह्यातील एक हजार 739 गावापैकी फक्त 360 गावातच महिला सुरक्षा समित्यांची स्थापना झाली आहे. 360 पैकी 28 समित्या बंद आहेत. त्यामुळे 332 समित्यांच्या फक्त कार्यरत आहेत.

कऱ्हाड - जिल्ह्यातील महिला सुरक्षा समितीचे काम अद्यापही कागदावरच आहे. जिल्ह्यातील एक हजार 739 गावापैकी फक्त 360 गावातच महिला सुरक्षा समित्यांची स्थापना झाली आहे. 360 पैकी 28 समित्या बंद आहेत. त्यामुळे 332 समित्यांच्या फक्त कार्यरत आहेत. जिल्ह्यातील अद्यापही एक हजार 407 गावांमध्ये त्या समित्या स्थापण्याच्या काहीच हालचाली झालेल्या दिसत नाहीत. तळबीड पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी महिला अशूनही त्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकही समिती स्थापन झालेले नाही. त्यामुळे जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांच्या महिला सुरक्षा समितीच्या ड्रीम प्रोजेक्टला जिल्ह्यातील पोलिस ठाण्यातून वाटाण्याच्या अक्षताच दाखवल्याचे या निमित्ताने स्पष्टं होते आहे. 

महिलांना त्यांच्यावर होणारे अत्याचार किंवा त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात तक्रार करण्यासाठी किंवा महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ असावे, यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यातंर्गत गावात एक महिला सुरक्षा समिती नेमण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी दिले होते. मात्र जिल्हा पोलिस अधिक्षक पाटील यांना त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टच्या आदेशाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील 29 पोलिस ठाण्यांतून केवळ 332 महिला सुरक्षा समित्यांची स्थापना झाली आहे. त्यात जिल्ह्यातील दहापेक्षा जास्त पोलिस ठाणी अशी आहेत, जेथे केवळ पाच किंवा त्याही पेक्षा कमी महिला सुरक्षा समित्यांची स्थापना आहे. चार पोलिस ठाण्यातील सुमारे 28 समित्या बंद आहेत. त्या समित्यांच्या स्थापना झाल्या आहेत. मात्र त्यांचे कामच नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे महिला सुरक्षा समित्यांची घोषणा हवेतच विरणारी दिसते आहे. जिल्ह्यात एक हजार 739 गाव आहेत. 2001 च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या 28 लाखांच्या आसपास आहे. जिल्ह्यात 29 पोलिस ठाणी आहेत. त्यामुळे महिला सुरक्षा समितीचे मोठ्या प्रमाणात व्हावे, अशी अपेक्षा होती. मात्र त्यापद्धतीने काम झालेले नाही. जिल्ह्यातील सुमारे एक हजार 407 गावामध्ये समित्याच नाहीत. तर चार पोलिस ठाण्यात 28 समित्यांचे काम बंद आहे. अवघ्या सहा पोलिस ठाण्यात पंचवीसपेक्षा जास्त समित्या आहेत. त्यामुळे महिला सुरक्षा समित्यांचा प्रोजेक्ट केवळ कागदावरच रंगल्याचे दिसते. 

समित्यातील टॉप पोलिस ठाणी अशी -
सातारा तालुका  34, पाटण 32, रहिमतपूर 30, कऱ्हाड शहर 25, कऱ्हाड तालुका 25 व शिरवळला 25 समित्यांची स्थापना झाली आहे.

कार्यक्षेत्र मोठे मात्र समित्या कमी असलेले पोलिस ठाणी अशी - 
कोयनानगर, पाचगणी, औंध, महाबळेश्वर प्रत्येकी एक,  सातारा शहर, शाहूपूरी, उंब्रज, पुसेगाव, दहवडी प्रत्येकी चार, फलटण शहर सहा तर फलटण तालुका पाच समित्या आहेत.

समित्यांचे काम बंद पडलेली पोलिस ठाणे -
तळबीडला पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकही महिलास सुरक्षा समिती नाही. उंब्रजला समित्या स्थापन झाल्यात 14 त्यातील 10 समित्यांचे काम बंद आहे. 

जिल्ह्यातील प्रत्येक गावात महिला सुरक्षा समिती स्थापन जाली पाहिजे, असे आमचे उद्धीष्ठ आहे. त्य़ासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. जिल्ह्यातील काही पोलिस ठाण्यात समित्या स्थापन जाल्या आहेत. काही ठिकमी सुरू आहे. सात दिवसात प्रत्येक पोलिस ठाण्याने महिला सुरक्षा समित्या स्थापन करम्याचे काम पूर्ण न केल्यास संबधितांवर कायदेशीर कारवाई कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.

तालुक्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या गावात महिला सुरक्षा समिती स्थापन झालीच पाहिजे. त्यात कार्यक्षम महिलांचा सहभाग करून घेतला पाहिजे. समितीची बैठक होऊन येणाऱ्या अडचणींची शहानीशा होऊन त्यावर उपायांची अंमलबजावणी झाली पाहिजे. सकाळच्या तनिष्का सभासदांनाही त्या समितीत स्थान दिले पाहिजे. असे मत मलकापूर येथील तनिष्का सदस्य विद्याताई थोरडवडे यांनी मत व्यक्त केले. 
 

Web Title: marathi news karhad women security committee