दहावीच्या परिक्षेबरोबर त्याला नियतीच्या परिक्षेस सामोरे जावे लागले

प्रकाश तिराळे
शुक्रवार, 16 मार्च 2018

मुरगूड : आज दहावीचा विज्ञान - 2 या  विषयाचा पेपर होता. पण या पेपरसाठी कुरुकली (ता.कागल) येथे मामाच्या गावी राहणाऱ्या कु.दिगंबर सुनिल कोथमिरे या विद्यार्थ्यास वडीलाच्या आकस्मिक निधनाने 270 किमी.चा प्रवास करावा लागला. वडीलाच्या जाण्याने भयभित झालेल्या या विद्यार्थ्यास दहावीच्या परिक्षेबरोबर नियतीच्या परिक्षेस ही सामोरे जावे लागले.

मुरगूड : आज दहावीचा विज्ञान - 2 या  विषयाचा पेपर होता. पण या पेपरसाठी कुरुकली (ता.कागल) येथे मामाच्या गावी राहणाऱ्या कु.दिगंबर सुनिल कोथमिरे या विद्यार्थ्यास वडीलाच्या आकस्मिक निधनाने 270 किमी.चा प्रवास करावा लागला. वडीलाच्या जाण्याने भयभित झालेल्या या विद्यार्थ्यास दहावीच्या परिक्षेबरोबर नियतीच्या परिक्षेस ही सामोरे जावे लागले.

अधिक माहिती अशी, सिंधुदूर्ग जिल्हयातील फोंडा येथील कु.दिगंबर सुनिल कोथमिरे हा घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची असल्याने कागल तालुक्यातील कुरुकली या आपल्या आजोळी मामाकडे शिक्षणासाठी राहत आहे.तो न्यू इंग्लीश स्कूल, कुरुकली या शाळेचा विद्यार्थी त्याची दहावीची परिक्षा सध्या सुरु आहे. आज विज्ञान विषयाचा पेपर होता. त्यासाठी तो नेहमी प्रमाणे पहाटे अभ्यास करत होता. याच दरम्यान मोबाईल फोन वाजला. हा फोन त्याच्या फोंडा या गावाकडून आला होता. सकाळच्या प्रसन्न वातावरणात अभ्यास करत असताना त्याला अतिशय दु:खद प्रसंगास सामोरे जावे लागले.

त्याचे वडील सुनिल गणपती कोथमिरे यांचे निधन झाले होते. ही घटना समजताच मनाने खचून गेलेल्या आपल्या भाच्याला सावरत मामा राजू शेटके यांनी अन्य नातेवाईकासह त्याला घेवून सकाळीच फोंड्याच्या दिशेने प्रवास केला. जवळपास 90 किलो मीटरचे अंतर तोडून ते सर्वजण फोंड्यात पोहचले.कु.दिगंबर ने जड अंत:करणाने वडीलांवर अंत्यसंस्कार केले.हमिदवाडा ता.कागल येथील केंद्रावर सकाळी 11 ते 1 या वेळेत होणाऱ्या विज्ञान विषयाचा पेपर देण्यासाठी पुन्हा 90 कि.मी.चा प्रवास करुन त्याला 10.30 वाजता केंद्रावर पोहचावे लागले.मनाला धीर देत नियतीच्या परिक्षेबरोबर दहावीच्या विज्ञान 2 या विषयाची परिक्षा त्यांने यावेळी दिली. संकटे कधी सांगून येत नसतात.हे कांही खोटे नाही. कारण उद्या शनिवार त्यात अमावस्या आणि रविवारी गुढी पाडवा असल्याने वडीलांचे रक्षाविसर्जन हे आजच सायंकाळी घेण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला होता.त्यामूळे दिगंबरला पेपर संपताच पुन्हा 90 किमी.चा प्रवास करावा लागला.हा प्रवास करुन त्याने वडीलाच्या रक्षाविसर्जनाचा विधी पूर्ण केला.त्यामूळे नियतीची परिक्षा देते वेळी न खचता त्याने दहावीच्या विज्ञान विषयाची परिक्षा 270 कि.मी.चा प्रवास करुन दिली.व नियतीने उभ्या केलेल्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Marathi news kolhapur news 10th student father dies