कोल्हापूरजवळ ट्रॅव्हल्स पंचगंगेत कोसळली; 13 जणांचा मृत्यू

संभाजी थोरात
शनिवार, 27 जानेवारी 2018

गणपतीपुळ्याहून कोल्हापूरकडे येणारी मिनी ट्रॅव्हल्स कोल्हापूरच्या शिवाजी पुलावर अाल्यानंतर पुलाच्या कठड्याला धडक देऊन कठड्यासह पंचगंगा नदीच्या पात्रात 100 फूट खाली कोसळली. रात्री साडे अकरा वाजता हा अपघात झाला. या मिनी ट्रॅव्हल्समध्ये पुणे जिल्ह्यातील बालेवाडी अाणि पिरंगुट येथील 16 जण होते. या 16 पैकी 13 जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर 3 जखमींवर सीपीअारमध्ये उपचार सुरु अाहेत. 

कोल्हापूर : गणपतीपुळेहून कोल्हापूरकडे येत असलेली मिनी ट्रॅव्हल्स पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाचा कठडा तोडून 100 फूट खाली कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात 13 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, तीन जण जखमी आहेत. चालकाने मद्यपान केल्याने गाडीवरील नियंत्रण सुटल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिनी ट्रॅव्हल्स पंचगंगा नदीत कोसळली, ही घटना शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. यामध्ये 13 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण जखमी अाहेत. मृत अाणि जखमी पुणे शहराजवळील पिरंगुट व बालेवाडी येथील रहिवाशी अाहेत. नवीन शिवाजी पुलाचे काम पुरातत्व खात्याच्या अादेशानुसार थांबल्याने 140 वर्षापूर्वीच्या जुन्या पुलावरुनच वाहतूक सुरु आहे.

गणपतीपुळ्याहून कोल्हापूरकडे येणारी मिनी ट्रॅव्हल्स कोल्हापूरच्या शिवाजी पुलावर अाल्यानंतर पुलाच्या कठड्याला धडक देऊन कठड्यासह पंचगंगा नदीच्या पात्रात 100 फूट खाली कोसळली. रात्री साडे अकरा वाजता हा अपघात झाला. या मिनी ट्रॅव्हल्समध्ये पुणे जिल्ह्यातील बालेवाडी अाणि पिरंगुट येथील 16 जण होते. या 16 पैकी 13 जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर 3 जखमींवर सीपीअारमध्ये उपचार सुरु अाहेत. 

काही तरुणांनी ही घटना पाहताच नदी पात्राकडे धाव घेतली अाणि मदतकार्य सुरु केले. या तरुणांमुळे तीन जणांचे प्राण वाचले. पहाटे तीन वाजेपर्यंत पोलिस, महापालिका अापत्ती व्यवस्थापन विभाग यांनी मिनी ट्रॅव्हल्स वर काढली. 

  मृत व्यक्तींची नांवे अशी -  संतोष बबनराव वरखडे (४५) गौरी संतोष वरखडे (16), ज्ञानेश्वरी संतोष वरखडे (14),  सचिन भरत केदारी (34), निलम सचिन केदारी (28), संस्कृती सचिन केदारी (8), सानिध्य सचिन केदारी (9), साहिल दिलीप केदारी (14), भावना दिलीप केदारी (35) , श्रावनी दिलीप केदारी (11),  छाया दिनेश नांगरे (41), प्रतिक दिनेश नांगरे (14),  मृतामध्ये वाहन चालकाचाही समावेश आहे मात्र वाहन चालकाचे नाव समजू शकले नाही. 

जखमी व्यक्तींची नावे अशी -  प्राजक्ता दिनेश नागरे (18) , मनिषा संतोष वरखडे (38) , मंदा भरत केदारी (54) 

Web Title: Marathi news Kolhapur news 13 dead in accident near Kolhapur in Panchganga river