'गोकुळ'चे दुकान बंद होईपर्यंत आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर : 'गोकुळ'चे दुकान बंद केल्याशिवाय दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटणार नाहीत. त्यासाठी आमचा लढा सुरूच आहे. आमदार सुरेश हाळवणकर यांनी हिंमत असेल, तर 'गोकुळ'वर प्रशासक नेमावा,' असे आव्हान आमदार सतेज पाटील यांनी दिले. 

आमदार हाळवणकर यांनी एका कार्यक्रमात गोकुळ विरुद्ध आंदोलन बंद झाले, असे वक्‍तव्य केले होते. त्याला आजच्या मोर्चात आमदार पाटील यांनी उत्तर दिले.

ते म्हणाले, ''गोकुळमधील भ्रष्टाचाराविरोधात आणि दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपला संघर्ष थांबलेला नाही. सहकार न्यायालयात यासंदर्भात खटला सुरू आहे. त्यावर दोनवेळा सुनावणी झाली. याचा निकाल तीन महिन्यांत लागावा, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी आपण उच्च न्यायालयातही जाणार आहे. ज्या तक्रारी केल्या आहेत व मागणी केली आहे, त्याप्रमाणे आमदार हाळवणकर यांनी हिंमत असेल, तर 'गोकुळ'वर प्रशासक नेमावा. आमचा संघर्ष दूध उत्पादकांना न्याय मिळावा यासाठी आहे. 
'गोकुळ'चे दुकान बंद केल्याशिवाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही.'' 

ते म्हणाले, ''अगोदर पालकमंत्री चंद्रकांत पाटील मंत्रिपदे वाटत होते. आता आमदार हाळवणकर वाटू लागले आहेत. उद्या पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधवही मंत्रीपद देतो म्हणून सांगतील. भाजपमध्ये काही नेम नाही. पालकमंत्री प्रश्‍नांपेक्षा महोत्सवातच अधिक रमू लागले आहेत. त्यांनी जिल्ह्यातील राजकारणात लक्ष घालण्याऐवजी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नात लक्ष घालावे व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.'' 

Web Title: marathi news kolhapur news Gokul Satej Patil